दक्षिण आफ्रिकेसाठी आज ‘करो वा मरो’

बेंगळुरू : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या टी-20 क्रिकेट मालिकेतील आज तिसरा आणि अखेरचा सामना होणार आहे. बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी आज ‘करो वा मरो’ची परिस्थिती असणार आहे. यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या कामगिरीची चिंता वाढली आहे.

मोहालीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने सात गडी राखून दिमाखदार विजय मिळवला. या सामन्यात गोलंदाजांची कामगिरी आणि कर्णधार विराट कोहलीची फलंदाजी महत्त्वाची ठरली. आता कसोटी मालिकेआधी आणखी एका वर्चस्वपूर्ण कामगिरीचा निर्धार संघाने केला आहे. धरमशाला येथील पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता.

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी मोहालीत कॅगिसो रबाडाच्या नेतृत्वाखालील वेगवान माऱ्याचा आत्मविश्वासाने सामना केला. रोहित मोठया खेळीत रूपांतर करण्यात अपयशी ठरला.

दक्षिण आफ्रिकेचा नवा कर्णधार क्विंटन डीकॉकच्या खांद्यावर नेतृत्वाच्या आणि फलंदाजीच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. डेव्हिड मिलर आणि रीझा हेन्ड्रिक्स यांच्याकडून त्याला साथ मिळण्याची आशा आहे.

ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला जवळपास वर्ष बाकी असताना भारतीय क्रिकेटने महेंद्रसिंह धोनीच्या पलीकडे विचार करण्याची आवश्यकता आहे, असे गावस्कर यांनी म्हटले आहे. महान  गावस्कर यांचे मत पंतला दिलासा देणारे आहे. 

महत्वाच्या बातम्या-