सलमानच्या ‘सीटी मार’ या गाण्यावर डाॅक्टरांनी केला भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

मुंबई| कोरोनाच्या दुस-या लाटेने महारौद्ररूप धारण केले आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

संपुर्ण देश सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी लढत आहे. त्यातच काही राज्यांमध्ये तर कोरोनाने हाहाकार केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही नंबर लागतो. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही.

अशातच बॉलिवूड स्टार सलमान खानचा ‘राधे – योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा रिलीज झाला आहे. चित्रपटगृहांत नाही तर ओटीटीवर. एकीकडे भाईजानच्या चाहत्यांच्या या सिनेमावर उड्या पडताहेत. सोशल मीडियावर या सिनेमाबद्दलचे वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळत आहेत.

नेटकरी चित्रपटातील वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करत ते व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यापैकी एक व्हिडीओ अभिनेत्री दिशा पाटनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दिशाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडीओत डॉक्टरांची टीम डान्स करताना दिसत आहे. ते सर्व ‘सीटी मार’ या गाण्यावर डान्स करत असल्याचे दिसत आहे. दिशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्यांचा हा व्हिडीओ शेअर केला होता, आणि त्याला कॅप्शन देतं ती म्हणाली, “रीयल हीरोज.” हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दिशाच्या फॅन पेजेसनेही हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेला पहायला मिळाला.

दरम्यान, देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसून येतोय. ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा तुटवडा सध्या भासतोय. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या जशी वाढतेय, तशी मृतांची संख्याही मन हेलवणारी आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे. देशातील प्रत्येक राज्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Team Disha (@teamdishap)

महत्वाच्या बातम्या – 

कोरोना होऊनही रुग्णालयातील फरशी साफ करताना दिसले…

हेअरकट आवडला नाही म्हणून 10 वर्षाच्या मुलानं लावला पोलिसांना…

नागीन डान्स करुन कोरोनावर करत होता उपचार; पोलिसांनी अशा…

देशातील सर्वात लहान कोरोना योद्धा! 10 दिवसांत चिमुकलीनं केली…

कौतुकास्पद! चिमुकल्यानं सायकलसाठी जमवलेले खाऊचे पैसे दिले…