कोरोनाचा ‘या’ अवयवावर होतोय गंभीर परिणाम?; धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली | कोरोना व्हायरस आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटची (Omicron Variant) लागण झालेल्या रुग्णांचा आकडा वाढतोय. वाढत्या रुग्णांचा आकडा पाहता आरोग्य विभागाचे अधिकारी सतर्क झाले आहेत. अशात सर्वांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे.

कोरोनाव्हायरसचा (Coronavirus ) शरीरातल्या कोणत्या अवयवावर कसा परिणाम होतो, यावरही अभ्यास सुरू आहे. मात्र या संशोधनादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

कोरोना श्वसनसंस्थेतून प्रवेश करत फुफ्फुसं आणि मेंदूपर्यंत पोहोचतो हे याआधी समोर आलं आहे.  पण कोरोना हृदयापर्यंत (Heart) पोहोचून तिथं दीर्घ काळ राहतो, असं नव्या संशोधनात स्पष्ट झालं आहे.

कोरोनाव्हायरस हा एका अवयवातून दुसऱ्या अवयवात प्रवेश करतो. त्यामुळे संबंधित रुग्णाला लॉंग कोविडचा सामना करावा लागतो. तसंच दीर्घ काळापर्यंत रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणं (Symptoms) दिसून येतात. अशा रुग्णांच्या केवळ श्वसनसंस्थेवरच नव्हे, तर अन्य अवयवांवरही या विषाणूमुळे परिणाम झाल्याचं दिसून येतं, असं शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोना विषाणू केवळ फुफ्फुसं आणि मेंदूपर्यंतच नाही, तर हृदयापर्यंत पोहोचतो आणि तिथे काही महिन्यांपर्यंत त्याचा संसर्ग दिसून येतो. अर्थात ही बाब लॉंग कोविडसाठी कारणीभूत ठरू शकते, असं यूएसमधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या शास्त्रज्ञांना संशोधनातून दिसून आलं आहे.

कोरोनाव्हायरस शरीराच्या विविध अवयवांमध्ये, म्हणजे जसं की हृदय किंवा मेंदूत पोहोचून तिथं जास्तीत जास्त 230 दिवसांपर्यंत राहू शकतो. ही बाब अधिक स्पष्टपणे जाणून घेण्यासाठी संशोधकांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृत्युमुखी पडलेल्या 44 रुग्णांचा अभ्यास केला.

या रुग्णांची अॅप्टॉप्सी करून त्यांचं हृदय, फुफ्फुस, लहान आतडं, अॅड्रिनल ग्लॅंडच्या पेशींमधून नमुने घेण्यात आले आणि त्यांची तपासणी करण्यात आली.

संसर्ग झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात विषाणू संपूर्ण शरीरात पसरू लागतो. पेशींना संसर्गग्रस्त करून तो मेंदूपर्यंत पोहोचू शकतो, असं संशोधनातून स्पष्ट झाल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

“माझ्यात आणि मोदींमध्ये एकत्र येण्यावर चर्चा झाली होती पण…” 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, नव्या वर्षात सरकारकडून मिळणार ‘हे’ गिफ्ट 

“…तर आम्ही 20 कोटी मुसलमान लढू”; नसिरूद्दीन शहांचं वक्तव्य चर्चेत 

राज्यपाल कोश्यारी म्हणतात, “महात्मा गांधींच्या सत्याग्रहापूर्वीच इंग्रजांनी…”

“पंकजा मुंडेंना घरी पाठवण्याचं पाप केलं म्हणून भाजपची सत्ता गेली”