“माझ्यात आणि मोदींमध्ये एकत्र येण्यावर चर्चा झाली होती पण…”

मुंबई | हे खरं आहे की माझी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि भाजपाने एकत्र येण्याबाबत चर्चा झाली. मोदींची तशी इच्छा होती, पण मी स्वतः त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना सांगितलं की, हे शक्य होणार नाही, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

निवडणुकीनंतर दीड महिने सरकार स्थापन झालं नव्हतं त्यामुळे सेना-भाजपत खूप अंतर वाढलं होतं. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात स्थिर सरकार आणण्यासाठी राष्ट्रवादीची गरज वाटली असेन, असंही पवारांनी सांगितलं.

साधी गोष्ट आहे की ते दोघे एकत्र यावं असा प्रयत्न आम्ही केला असता, तर आम्ही पुन्हा 5 वर्षे सत्तेबाहेर राहिलो असतो. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे हे दिसत होतं आणि ते तातडीने मुख्यमंत्रीपद हवंय म्हणत होते. त्यामुळे तेव्हा तात्पुरतं त्यांना पोषक वक्तव्य केल्यानं नुकसान होणार नव्हतं, असं पवारांनी सांगितलं.

माझ्या या एका वक्तव्यामुळे सेनेत अस्वस्थता निर्माण झाली आणि फडणवीसांकडून असं काही सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे ते आमच्यासोबत आले, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

तेव्हा स्पष्ट बहुमत कुणाकडेच नव्हतं. आघाडी म्हणून बघितलं तर सेना-भाजपकडे बहुमत होतं. मात्र, सेना आणि भाजप एकत्र राहणार नाही हे आम्हाला दिसलं. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला आत्ता जे सत्तेत येऊ पाहत आहेत त्यांना बाजूला करायचं असेन तर त्यांना सोयीची भूमिका घेणं शक्य नाही. म्हणून पहिल्यांदा निवडणूक झाल्यावर मी दिल्लीत एक वक्तव्य केलं, असं पवारांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांना बहुमतासाठी काही लोकांची कमतरता असेन तर आम्ही त्याचा गांभीर्याने विचार करू. माझं ते एक वक्तव्य सेना-भाजपतील अंतर वाढायला फार उपयोगी पडलं, असा खुलासा शरद पवारांनी केला आहे.

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मीच अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस आणि भाजपसोबत पाठवलं अशी चर्चा असते हे खरं आहे. पण मी त्यांना पाठवलं असतं तर त्यांनी राज्यच बनवलं असतं. त्यांनी अर्धवट काही काम केलं नसतं, असंही पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, नव्या वर्षात सरकारकडून मिळणार ‘हे’ गिफ्ट 

“…तर आम्ही 20 कोटी मुसलमान लढू”; नसिरूद्दीन शहांचं वक्तव्य चर्चेत 

राज्यपाल कोश्यारी म्हणतात, “महात्मा गांधींच्या सत्याग्रहापूर्वीच इंग्रजांनी…”

“पंकजा मुंडेंना घरी पाठवण्याचं पाप केलं म्हणून भाजपची सत्ता गेली”

दिलासा नाहीच! नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम