भारताविरूद्ध बोलताना सांभाळून बोला; डोनाल्ड ट्रम्प यांचा इम्रान खान यांना सल्ला!

वॉशिंग्टन : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्नावर भारताविरुद्ध सांभाळून बोलावं, असा सल्ला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी फोनवरून चर्चा केली. कठीण परिस्थितीपासून वाचण्यासाठी दोन्ही देशांनी संयम बाळगावा, अशी सूचनाही त्यांनी केल्याचं कळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात सोमवारी 30 मिनिटे फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्याशी चर्चा केली.

फोनवरील चर्चेदरम्यान मोदी यांनी ट्रम्प यांना हे निदर्शनास आणून दिले होतं की, पाकिस्तानचे नेते भारताविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत. यानंतर ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्याशी फोनवरून चर्चा करून काश्मीरबाबत वक्तव्य करताना संयम बाळगण्यास सांगितलं आहे.

भारत सरकार हे हुकूमशाही आणि वर्चस्ववादी आहे. तसेच, पाकिस्तान आणि भारतातील अल्पसंख्याकांसाठी हा धोका आहे. भारताच्या अण्वस्त्र सुरक्षेबाबत जगाने विचार करायला हवा, कारण त्याचा जगावर परिणाम होणार आहे, असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

माझे दोन चांगले मित्र नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्याशी व्यापार, भागीदारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काश्मीरवरील तणाव कमी करण्याबाबत चर्चा झाली, असं ट्विट नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्याशी चर्चा केल्यानंतर ट्रम्प यांनी केलं होतं.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इंग्लंडने चीन अथवा पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही, या चर्चेत आम्ही भारताविरुद्ध चीनची साथ दिली नाही, अशी माहिती इंग्लंडच्या परराष्ट्रविषयक सूत्रांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अटकेच्या भीतीपोटी पी. चिदंबरम घरातून बेपत्ता!

-राष्ट्रवादीला मोठा धक्का; खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर???

-भारतीय संघात नाही पण ‘हा’ खेळाडू ‘या’ कारणामुळे असणार संघासोबत!

-ICC कसोटी क्रमवारी जाहीर; स्मिथचा कोहलीला दे धक्का??

-मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणाऱ्या ‘त्या’ पोस्टरवरुन भाजपविरोधात संताप