राज ठाकरेंना ईडीची नोटीस; ठाण्यात मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडी नोटीस पाठवल्याच्या कारणामुळे ठाण्यातील एका मनसे कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रवीण चौगुले असं या तरुणाचं नाव आहे. मंगळवारी 20 ऑगस्टला रात्री उशिरा ही घटना घडली आहे. प्रवीण हा मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्या जवळचा होता. प्रवीण हा ठाण्यातील विटावा भागात राहत होता.

राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आली आहे. त्यामुळे त्यांना चौकशीला सामोरे जावं लागणार आहे. यामुळे मी दु:खावलो असून आत्महत्या करतोय, असं प्रवीणने त्याच्या मित्रांना आत्महत्येपूर्वी सांगितलं होतं.

त्याने स्वत:ला पेटवून घेतले. त्याने आत्महत्या केल्याचं कळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचा मृतदेह कळव्यातील शिवाजी रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.

एवढंच नव्हे तर काल दिवसभरात त्याने त्याच्या फेसबुकवर राज ठाकरेंच्या समर्थनात आणि ईडीच्या विरोधात अपशब्द वापरुन हजारो पोस्ट लिहिल्या आहेत.

प्रवीण हा ठाण्यातील कट्टर मनसैनिक होता. मनसेच्या अनेक कार्यक्रम, मोर्चा किंवा आंदोलनात तो सहभागी असायचा. प्रत्येक मोर्चात प्रविण मनसेचा झेंडा त्याच्या शरीरावर रंगवायचा. तसेच स्थानिक नेत्यांच्याही तो फार जवळचा होता. त्याने फेसबुकवर मनसेच्या नेत्यांसोबत फोटो पोस्ट केले आहेत. त्याच्या आत्महत्येमुळे मनसैनिकांना फार मोठा धक्का बसला आहे.

राज ठाकरेंना ईडीने कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी नोटीस पाठवली आहे. त्यांना येत्या 22 ऑगस्टला राज ठाकरे यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. या प्रकरणामुळे मनसेच्या अनेक कार्यकर्त्यामध्ये संताप पाहायला मिळत आहे. तसेच येत्या 22 ऑगस्टला मनसेचे कार्यकर्ते आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-भारताविरूद्ध बोलताना सांभाळून बोला; डोनाल्ड ट्रम्प यांचा इम्रान खान यांना सल्ला!

-अटकेच्या भीतीपोटी पी. चिदंबरम घरातून बेपत्ता!

-राष्ट्रवादीला मोठा धक्का; खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर???

-भारतीय संघात नाही पण ‘हा’ खेळाडू ‘या’ कारणामुळे असणार संघासोबत!

-ICC कसोटी क्रमवारी जाहीर; स्मिथचा कोहलीला दे धक्का??