कोणत्याही लसीशिवाय कोरोना निघून जाणार; डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

नवी दिल्ली |  प्रतिबंधित लसीशिवाय करोना व्हायरस निघून जाईल असं वक्तव्य आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. तसंच अमेरिकेत येत्या काळात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 95 हजार किंवा त्यापेक्षाही पुढे जाईल, असंही भाकित ट्रम्प यांनी केलं आहे.

हा कोणत्याही लसीशिवायच दूर जाईल. असा दूर जाईल की आपण त्याला पुन्हा पाहूच शकणार नाही’, असं ते म्हणाले. असे अनेक आजार आले आणि कोणत्याही लसीशिवाय नाहीसे झाले, याचा त्यांनी आपल्या वक्तव्याला आधार दिला.

खरंतर सध्या सगळं जग करोनाचा सामना करतं आहे. जगभरातल्या 200 देशांवर करोना नावाचं संकट कोसळलं आहे. अनेकांचा या रोगाची लागण झाल्याने मृत्यूही झाला आहे. अशात आता डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही लसीशिवाय करोना निघून जाईल असं वक्तव्य केलं आहे.

देश अतिशय मोठ्या संकटातून जात असतानाच दर दिवशी संपूर्ण जगभरात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वक्तव्या अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत. काल त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली होती. आज त्यांनी स्वत: पत्रकार घेत अमेरिकेतली कोरोनाच्या परिस्थितीविषयी माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या-

-“उपलब्ध झालेले रोजगार हीच संधी आहे… मराठी तरूणांनो नंतर गळे काढून रडू नका”

-भाजपने विधानपरिषदेची जागा न दिल्याने रामदास आठवले नाराज!

-रेल्वेखाली चिरडून मरण पावलेले कोरोना आणि लॉकडाऊनचे बळी- संजय राऊत

-आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड, ‘या’ छुप्या पद्धतीनं काढून टाकलं जातंय

-“मजुरांच्या गाड्यांना बंगालमध्ये प्रवेश न देणं हे माणुसकीला धरून नाही”