“दहशतवादाविरोधात लढताना डोनाल्ड ट्रम्पही मजबुतीने आपल्यासोबत”

ह्यूस्टन (टेक्सास) : ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर भाष्य केलं आहे. आता आपल्याला दहशतवादाविरोधात लढण्याची गरज आहे. तसेचं या लढाईत आपल्यासोबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही मजबुतीने आपल्या सोबत आहेत, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच, यावेळी मोदींनी पाकिस्तानवरही निशाणा साधला.

मोदी काल 22 सप्टेंबर या दिवशी अमेरिकाच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी टेक्सास येथील ह्यूस्टनच्या अनिवासी भारतीयांशी संवाद साधला आहे. यावेळी मोदींसाठी ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

ह्यूस्टन येथे आलेल्या पंतप्रधान मोदींचे तेथील अनिवासी भारतीय नागरिकांनी वेगवेगळ्या पद्धतीने अतिशय उत्साहात स्वागत केलं. या कार्यक्रमात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

 ह्यूस्टनच्या काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाने या कार्यक्रमावेळी नरेंद्र मोदींचा भेट घेतली. यावेळी त्यांनी कलम 370 हटवल्याबद्दल मोदींचे आभारही व्यक्त केले.

दरम्यान, ह्यूस्टनच्या एनआरजी स्टेडिअमवर पंतप्रधान मोदींचा हा ‘हाउडी मोदी’ हा कार्यक्रम पार पडत आहे. यावेळी मोदींसह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.

महत्त्वाच्या बातम्या –