कझाकस्तान | कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत मराठमोळ्या राहुल आवारेने कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला मराठी चेहरा ठरला आहे.
अमेरिकेच्या टायलर ग्राफवर त्यानं 11-4 अशी खेळी रचत त्याने कांस्यपदक आपल्या नावे केलं. तो 61 किलो वजनी गटात खेळत होता.
2018 ला राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत त्यांनं सुवर्ण यश मिळवलं होतं. 2011 आणि 2019 ला आशियायी कुस्ती स्पर्धेत देखील कांस्यपदक आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक राहुलने पटकावलं होतं.
नरसिंह यादव आणि संदीप तुलसी यादव या दोन अमराठी असणाऱ्या परंतू महाराष्ट्रासाठी खेळणाऱ्या पैलवानांनी जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं पण राहुल आवारेच्या रूपाने पहिल्या मराठमोळ्या कुस्तीपटूने कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.
राहुलनं मिळवलेल्या या यशामुळं महाराष्ट्रासोबतच त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. राहुल खेळत असलेला वजनी गट ऑलिम्पिकमध्ये नाही. त्यामुळे तो ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही.
महत्वाच्या बातम्या-
पाकव्याप्त काश्मिरचा वाद देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंमुळेच- अमित शहा https://t.co/WRA4fWw8Kt @AmitShah
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
“बाळासाहेब थोरात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत की संगमनेरचे??” https://t.co/NZ1aDwKAoR @AshishRDeshmukh @bb_thorat @INCMaharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
…तर ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यास दर दिवशी शंभर रुपये मिळणार!https://t.co/0lySVu7yZK @RBI
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019