“अमेरिकेच्या विमानावर चीनचा झेंडा लावून रशियावर हल्ला करा”

नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या सैन्याला युक्रेनची राजधानी कीव शहरावर ताबा मिळवण्याचे आदेश दिले आहेत.

रशियन सैन्यानं युक्रेनवर तिन्ही दलांच्या मदतीनं हल्ला केला आहे. युक्रेनमधील एक-एक शहर रशियन सैनिक बेचिराख करत आहेत. धुराचे लोट आणि मृतदेहाचा खच पडत चालला आहे, असं असलं तरी जगातील इतर देशांना हे युद्ध थांबवण्यात अपयश येत आहे.

युक्रेनमध्ये सध्या परिस्थिती खूपच नाजूक बनत चालली आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी जगातील इतर देशांना मदतीचं आवाहन केलं आहे. परिणामी अनेक देशांनी युक्रेनला मदत पाठवली आहे. अशातच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मात्र जगातील जे देश युक्रेनला युद्धात मदत करतील त्यांना गंभीर परिणामी भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. अशातच ट्रम्प यांनी वक्तव्य केल्यानं वाद वाढला आहे.

अमेरिकेनं आपल्या लडाकू विमानांवर चीनचा ध्वज लावून रशियावर हल्ले करावेत, असं वादग्रस्त वक्तव्य ट्रम्प यांनी केल्यानं वाद वाढला आहे. सर्व स्तरातून ट्रम्प यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे.

ट्रम्प यांनी नागरिकांना हसवण्यासाठी असं वक्तव्य केल्याचं नंतर म्हटलं. रशियावर हल्ला केल्यानंतर आपण फक्त चीन आणि रशियाचं भांडण बघायचं, असं देखील ट्रम्प म्हणाले होते.

रशिया-युक्रेन युद्धाला 11 दिवस झाल्यानंतरही दोन्ही देशांतील युद्ध थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. व्लादिमीर पुतिन काही केल्या माघार घेण्यास तयार नाहीत. परिणामी सर्वांंचं टेंन्शन वाढलं आहे.

युक्रेन-रशिया युद्धानं जगावर महागाईचे ढग जमत आहेत. अशात दोन्ही देशांच्या शिष्टमंडळानं शांतीच्या प्रस्तावावर सहमती करण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. पहिल्या फेरीत काहीच न झाल्यानं आता चर्चेची दुसरी फेरी होणार आहे.

दरम्यान, रशियाला युद्धाचे प्रचंड परिणाम सोसावे लागत आहेत. युरोपियन युनियन, अमेरिका, नाटो, संयुक्त राष्ट्र, ब्रिटन सर्वांनी रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; वाचा आजचे ताजे दर

नवाब मलिकांना दिलासा नाहीच! कोर्टानं ‘या’ तारखेपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी

आत्ताची सर्वात मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाचं विधेयक अधिवेशनात मंजूर

“…तर अजित दादांना फासावर लटकवाल का?”

‘…तर मी विधानसभेतच फाशी घेईल’; रवी राणा भडकले