‘वय विचारू नका, थोडी लाज वाटते’ म्हणत ‘या’ अभिनेत्रीने दिल्या स्वत:ला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई |   मराठी सिनेसृष्टीतील लेखक आणि दिग्दर्शक नागराज मंजूळे यांच्या फँड्री चित्रपट शालू म्हणजेच राजेश्वरी खरातने सर्वांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. फँड्री चित्रपटात राजेश्वरीने मुख्य भूमिका साकारली होती. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर महाराष्ट्रात एक वेगळंच नाव कमावलं आहे.

राजेश्वरीचा फँड्री हा चित्रपट पहिला होता. तिने या चित्रपटातूनच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. राजेश्वरी तिच्या सोशल मीडियावर खूप अॅक्टीव असते. वारंवार ती आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून काहीना-काही पोस्ट करत असते. आज राजेश्वरीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिने स्वत:ला शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवर एक फोटो पोस्ट करत. त्या खाली तिने दहा-बारा ओळींमध्ये आपल्या मनातील काही गोष्टी शेअर केल्या आहेत. तिने आजपर्यंतच्या तिच्या प्रवासाबद्दलही लिहिले आहे. राजेश्वरीने  त्यात सुरूवातीलाच लिहिले की, वय विचारू नका, थोडी लाज वाटते. 

राजेश्वरीने केलेली ही पोस्ट सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनली असून, तिचे चाहते तिच्या या पोस्टला भरभरून कमेंट करत आहेत. तसेच या पोस्टला अनेकांनी लाईक केलं असून, तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावही होत असल्याच पाहायला मिळत आहे.

अनेक लोक भेटली कोणी आपले झाले कोणी काम झाल्यावर बाजूला झाले आणि काही अजूनही सोबत उभे आहेत. वेळ चांगली असो वा वाईट आपण सर्व माझ्यासोबत होता आणि आपण दिलेल्या प्रमेमामुळे आज राजेश्वरी आज इथे पोहचली असल्याचं तिनी म्हटलं आहे.

राजेश्वरी तिचा वाढदिवस कोरोनाची परिस्थीती पाहाता साजरा करणार नसल्याचं तिनं सागितलं आहे. तसेच तिनी सर्वांना या कोरोना काळात काळजी घेण्याचंही आवाहन केलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजेश्वरीने तिच्या आकाऊंटवरून एका गाण्यावर डांन्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. तसेच तिने या व्हिडीओमध्ये आपला हॉट लूक दाखवला होता. हा व्हिडीओ राजेश्वरीने फेसबुक आकाऊंटवरून पोस्ट केला होता.

महत्वाच्या बातम्या-

कार्तिक आर्यनने घेतलेल्या ‘लॅम्बोर्गिनी’समोर असं…

राशीभविष्य : आज ‘या’ राशीच्या लोकांसाठी आहे…

कोरोनावर मात केल्यानंतर अभिनेत्री प्रिया बापट…

हाय गर्मी! ‘टकाटक’ गर्लच्या या लूकने चाहते…

‘आम्हीही फ्रंटलाईन वर्कर्स…’; व्येशा…

 

 

 

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy