“राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाल्यास आश्चर्य वाटू नये”

अमरावती | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज भेट झाली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन शरद पवारांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. तब्बल 25 मिनिटं या दोन्ही नेत्यामध्ये बैठक पार पडली.

पवार मोदी भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे आमदार नाराज असल्याचं दिसत होतं. त्यामुळे आता ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

अशातच युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार रवी राणा यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाल्यास आश्चर्य वाटू नये, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.

शरद पवार वेगळ्या दिशेने बोलतात आणि करतात वेगळं त्यामुळं काहीही होऊ शकतं, असं सुचक वक्तव्य रवी राणा यांनी म्हटलं आहे.

सरकारमधील सर्व पैसे हे मातोश्रीवर पोहचले जातात. हे पैसे अनिल परब आणि संजय राऊत यांच्या मार्फत जातात. त्यामुळे मातोश्री अडचणीत येऊ शकते, असंही रवी राणा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजप नेत्यांनी देखील या प्रकरणावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता शरद पवार आणखी एक डाव टाकणार की काय?, अशी चिंता आता सर्वांना लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“अमित ठाकरेंना हनुमान चालिसा येत नसेल तर…”

जगाचं टेन्शन वाढलं! कोरोनानंतर आता Rhinovirus एन्ट्री; डाॅक्टर चिंतेत

Sharad Pawar: राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार?, शरद पवार म्हणाले…

Sharad Pawar: पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…