नवी दिल्ली | लग्नानंतर नवरा आणि बायकोचं नातं हे गुलाबाच्या नाजूक फुलासारखं असतं असं मानलं जातं. लग्नानंतर दोघांना थोडा वेळ मिळावा आणि खासगी वेळ मिळावा म्हणून अनेकजण हनीमूनचा प्लॅन करतात.
हनीमूनचा काळ हा गोल्डन पिरी़यड असतो. यावेळात अनेकजण लाईफ पार्टनरला वेळ देऊन एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अशातच अमेरिकेतील एका व्यक्तीने त्याची समस्या एका पोर्टलवर मांडली. त्यावेळी त्याच्या हनिमूनचा किस्सा सांगितला.
हनीमूनला जायचं म्हणून नवऱ्याने ऑफिसमधून सुट्टीचा रजा अर्ज टाकला. बाॅसने तो मंजूर देखील केला. त्यानंतर नवरा बायकोसोबत हनीमूनसाठी कम्बोडियाला गेला.
बायको आणि नवरा आनंदात हनीमून एन्जाॅय करत होते. दोघांंनी एकमेकांना गिफ्ट दिली. त्यानंतर त्यांनी सेक्स लाईफ देखील एन्जाॅय केली. हनीमूनला असताना एका रात्री अचानक नवऱ्याला त्याच्या बाॅसचा काॅल आला.
ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचं काम असल्याने हनीमून रद्द करून ऑफिसला ये, असा आदेश बाॅसने दिला. खूप विनंती करून देखील बाॅसने काही ऐकलं नाही. त्याला शेवटी नोकरी गमावशील, अशी धमकी देखील दिली.
हनीमूनच्या रात्री पत्नीला नवऱ्याने ही गोष्ट सांगितली. त्यावेळी बायको रागात लालबुंद झाल्याचं नवऱ्याने सांगितलं. तिच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा क्षण असा खराब होणार होता.
मला काही समजेना, अशी समस्या एका पोर्टलवर नवऱ्याने मांडली आहे. त्यावर नेटकऱ्यांनी अनेक पर्याय सुचवले आहेत. काहींना आक्रमक मतं देखील मांडल्याचं पहायला मिळालं.
दरम्यान, काहींनी हनीमून रिप्लाॅन कर पण नोकरी वाचव, असा सल्ला दिलाय. तर काहींनी हनीमून एन्जाॅय कर, असा सल्ला दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाल्यास आश्चर्य वाटू नये”
“अमित ठाकरेंना हनुमान चालिसा येत नसेल तर…”
जगाचं टेन्शन वाढलं! कोरोनानंतर आता Rhinovirus एन्ट्री; डाॅक्टर चिंतेत
Sharad Pawar: राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार?, शरद पवार म्हणाले…
Sharad Pawar: पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…