“बुरा ना मानो, होली है!”, उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ शेअर करत मनसेचा टोला; पाहा व्हिडीओ

मुंबई | मागील काही दिवसांपासून वीज तोडणीचा मुद्दा राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. शेतकऱ्यांच्या वीजतोडणीचा मुद्दा तापलेला असताना मनसेनं उद्धव ठाकरेंच्या जुन्या आश्वासनाचा एक व्हिडीओ मनसेने शेअर केला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ‘बुरा ना मानो, होली है’, असं कॅप्शन देत व्हिडीओ उद्धव ठाकरे यांचा जुन्या एका भाषणातील एक क्लिप शेअर केली आहे.

अनेक ठिकाणी विहिरीला पाणी असतं पण तिथं वीज नसते म्हणून तुम्ही ते पाणी पिकाला देऊ शकत नाहीत. मला सत्ता द्या, मी तुमच्यासाठी एक उपकरण तयार ठेवलं आहे, असं उद्धव ठाकरे या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत.

मी तुम्हाला वीज तर देईनच. पण जोपर्यंत वीज देता येणार नाही, तोपर्यंत ते उपकरण तुम्हाला देईन. ते उपकरण तुमच्या बैलाच्या सहाय्याने चालेल, असं संकल्पना देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडली होती.

वीज नसताना देखील तुम्ही पिकाला पंपाच्या माध्यमातून पाणी देऊ शकाल, असं उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले होते. त्यावर आता मनसेने टोला लगावला आहे.

दरम्यान, होळीच्या निमित्ताने आज राज्याच्या राजकारणात देखील आरोप प्रत्यारोपाची उधळण होताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ


महत्त्वाच्या बातम्या – 

“…म्हणून मलिकांचा राजीनामा घेतला नाही”, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

मलिकांच्या अटकेला धार्मिक रंग! बाळासाहेबांच्या वाक्याचा दाखला देत चंद्रकांत पाटील म्हणाले…

रशिया-युक्रेन युद्धात Elon Muskची उडी; आता ‘या’ देशाला मदत करणार

“ज्यांना मुलबाळ नाही, त्यांना कुटुंबीयांच्या वेदना काय कळणार?”

युरोपियन संसदेत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना स्टँडिंग ओवेशन, टाळ्यांचा कडकडाट थांबेना; पाहा व्हिडीओ