“बेजबाबदार वक्तव्य करू नका, नाहीतर जीभ कापून टाकू”

हैदराबाद | गेल्या अनेक वर्षापासून केंद्र सरकार विरूद्ध राज्य सरकार असा संघर्ष सात्त्याने पहायला मिळतो. सध्या केंद्रात भाजपचं सरकार असल्याने ज्या राज्यात भाजप विरोधी पक्ष सत्तेत आहे, अशा राज्यातील वाद उफाळून येताना दिसतोय.

अशातच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी भाजप नेत्यांवर आक्रमक टीका करत संताप व्यक्त केला आहे. भाजप नेते दुपट्टीपणा करत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.

बेजबाबदार वक्तव्य (लूज टाॅक) करणं टाळा अन्यथा जीभ कापून टाकू, असं वादग्रस्त वक्तव्य देखील के चंद्रशेखर राव यांनी केलं आहे. तेलंगणामधील भाजपचे प्रमुख नेते बांडी संजय कुमार यांना उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

संजय बांडी तेलंगणातील शेतकऱ्यांना धान्याची शेती करण्याचा सल्ला देत आहेत. तर त्यांच्याकडून शेतमाल खरेदी करण्याचं खोटं आश्वासन देखील देत आहेत, अशी टीका त्यांनी संजय बांडी यांच्यावर केली.

केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की धान्य खरेदी केली जाणार नाही. मात्र राज्यातील भाजपचे प्रमुख नेते नागरिकांना शेतमाल खरेदी करण्याचं आश्वासन देत आहे, असंही के चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे.

यावर्षीचा तोटा टाळण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्र्यांनी इतर धान्य घेण्याचा सल्ला दिला आहे. राज्याने खरेदी केलेलं तांदूळ विकत घ्यावं यासाठी मी केंद्रीय कृषीमंत्र्यांना भेटल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

आम्ही तुम्हाला लवकरात लवकर निर्णय घेऊन सुचना देऊ, असं त्यावेळी  केंद्रीय कृषीमंत्र्यांनी सांगितलं होतं, मात्र अद्याप त्यांनी कोणतीही सुचना दिली नसल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

तेलंगणा राज्याकडे गेल्या वर्षीपासून 5 लाख टन धान्य अधिक उपलब्ध आहे, पंरतु केंद्र सरकार हे धान्य खरेदी करण्यास तयार नाही. त्यामुळे केंद्राचा व्यवहार किती बेजबदार आहे हे दिसून येतंय, असं म्हणत मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी संताप व्यक्त केला आहे.

बांडी संजय म्हणतात की ते मला तुरंगात टाकणार. तुम्ही मसा हात तरी लावून दाखवाच, असं खुल्लं आव्हान देखील त्यांनी यावेळी दिलं आहे.

हे लोक शेतकऱ्यांवर गाड्या चढवतात. यांचा मुख्यमंत्री मंत्र्यांच्या पोराला शेतकऱ्याला मारहाण करण्यास सुट देतो, असं म्हणत त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

वायू प्रदूषणामुळे वाढतोय कोरोना; ‘या’ व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका

“मला संपवण्यासाठी महाविकास आघाडीने षडयंत्र रचून हल्ला केला”

वाढदिवसाला हारतुरे केक नको, पुण्यात रक्ताचा तुटवडा, रक्तदान करा- मुरलीधर मोहोळ 

महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता, ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

मी पंतप्रधान झालो तर पहिला निर्णय ‘हा’ घेईन- राहुल गांधी