नवी दिल्ली | जगातील सर्वोत्कृष्ट संघ म्हणून बिरूदावली मिरवणाऱ्या भारतीय संघाला विश्वचषकाच्या अंतिम चार संघामध्ये स्थान मिळवता आलं नाही. परिणामी भारतीय संघावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
भारतीय संघ 2012 पासून पहिल्यांदा आयसीसीच्या कोणत्याही क्रिकेट प्रकारातून सेमीफायनलला न पोहचता बाद होण्याची ही पहिली वेळ आहे. अनेक खेळाडूंनी भारताच्या अपयशाचं खापर आयपीएलवर फोडलं आहे.
भारताच्या पहिल्या विश्वचषक विजयाचे शिल्पकार कपिल देव यांनी भारतीय संघाचे आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे दोन्हींचे कान टोचले आहेत. बीसीसीआयनं योग्य व्यवस्थापन करण्याची गरज असल्याचं मत देव यांनी व्यक्त केलं आहे.
भारताचा मर्यादीत षटकांच्या प्रकारातील कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही शेवटची स्पर्धा आहे. टी ट्वेंटी प्रकारतील कर्णधारपदाचा कोहलीनं राजीनामा दिला आहे. अशातच आता भारताला नवीन कर्णधाराच्या नेतृत्वात येणाऱ्या स्पर्धा खेळायच्या आहेत.
भारतीय क्रिकेट बोर्डानं इतर गोष्टींचा विचार सोडून भारतीय संघाच्या कामगिरीवर लक्ष देण्याची गरज कपिल देव यांनी बोलून दाखवली आहे. कपिल देव भारतीय संघाच्या विश्वचषकातील कामगिरीवर निराश असल्याचं दिसतंय.
वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं म्हणजे सर्व काही संपलं असं नाही. पण नियोजन करणे गरजेचे आहे, असं मतं दिग्गज क्रिकेटर कपिल देव यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.
आयपीएल आणि विश्वचषकात काही अंतर हवे. भारताकडे अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत पण संघाला त्यांचा उपयोग करून घेता नाही आला, अशी टीका भारतीय संघ व्यवस्थापकांवर कपिल देव यांनी केली आहे.
काही खेळाडू देशाकडून खेळण्यापेक्षा आयपीएल खेळण्यावर भर देतात या गोष्टीकडं बीसीसीआयनं लक्ष देणं गरजेचं आहे. माझा आयपीएलला विरोध नाही पण त्याचा क्रम ठरवण्याची गरज आहे, असंही कपिल देव म्हणाले आहेत.
जे खेळाडू देशापेक्षा आयपीएलला महत्त देतात त्यांच्याबद्दल काय बोलायचं. माझ्या मते अगोदर देश आणि नंतर आयपीएल असायला हवं, अशी स्पष्ट भूमिका कपिल देव यांनी यावेळी घेतली आहे.
दरम्यान, आपल्याला टी ट्वेंटी विश्वचषकातून खूप मोठा धडा मिळाला आहे. पुढच्या वेळी अशा चुका टाळल्या जाव्यात, असं कपिल देव यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“बेजबाबदार वक्तव्य करू नका, नाहीतर जीभ कापून टाकू”
वायू प्रदूषणामुळे वाढतोय कोरोना; ‘या’ व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका
“मला संपवण्यासाठी महाविकास आघाडीने षडयंत्र रचून हल्ला केला”
वाढदिवसाला हारतुरे केक नको, पुण्यात रक्ताचा तुटवडा, रक्तदान करा- मुरलीधर मोहोळ
महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता, ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत