“महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळू नका, मोदींनी शिवजयंतीला माफी मागून प्रायश्चित करावं”

मुंबई | अर्थसंकल्पावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आणि राज्यसभेत काँग्रेसवर कडाडून टीका केली होती. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर देखील टीका केली.

कोरोना काळात महाराष्ट्र काँग्रेसने परप्रांतियांना रेल्वेमध्ये घरी पाठवलं, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यावर आता काँग्रेस आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय.

महाराष्ट्राने कोरोना पसरवला असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंमद्र मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. या अपमानाबद्दल मोदींनी देशाची माफी मागावी, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मुंबईत आंदोलन केलं होतं. मात्र, त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. त्यानंतर आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा काँग्रेसने आखला आहे.

शिवजयंतीदिनी पंतप्रधान मोदींना महाराष्ट्राची माफी मागत आपल्या पापाचं प्रायश्चित करावं, असा आशयाचं पत्र काँग्रेस देवेंद्र फडणवीस लिहिणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय.

महाराष्ट्रच्या भाजप नेत्यांनी दिल्लीच्या दबावाखाली महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त माफी मागून आपल्या पापांचे प्राश्चित करावं, अशी पत्रे राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्ते लिहित असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय.

दरम्यान, तुमचे नेते नरेंद्र मोदींना सांगा की तुम्हाला महाराष्ट्राची माफी मागावी लागेल. सत्तेसमोर गुडघे टेकवून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळू नका, जनता तुम्हाला माफ करणार नाही, असंही नानांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

तो बँजो वाजवत राहिला अन् शिकारी कोल्हा फक्त ऐकतच राहिला; तुफान शेअर होतोय व्हिडीओ

स्वप्न भंगलं अन् चौफेर फटकेबाजी करणारा MR 360 भर मैदानात ढसाढसा रडला!

किरीट सोमय्यांना अटक होणार?, संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

तरूणांना नोकरीची सुवर्णसंधी; ‘ही’ दिग्गज IT कंपनी देणार 55 हजार जणांना नोकरी

तुमची लाडकी Wagon R येतेय नव्या रूपात; जाणून घ्या फिचर्स