मुंबई | ज्येष्ठ शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर सुधीर जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर येतं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तुत्वानं प्रभावित झालेल्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.
सुधीर जोशी यांचं वयाच्या 81 व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी निधन झालं आहे. जानेवारीत कोरोनाची बाधा झाल्यानं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
शिवसेना पक्षाची पाळेमुळे संघटनेच्या स्वरूपात रूजलेली आहेत. शिवसेनेचं संघटन वाढवण्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत सुधीर जोशी यांचं मोठं योगदान आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत भूमीपुत्रांच्या हक्कांसाठी आणि मराठी माणसांसाठी रस्त्यावर उतरत आंदोलन करायला सुरूवात केली. त्यादरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत सुधीर जोशी सर्वात पुढे होते.
राज्याच्या राजकारणात सुधीर जोशी यांना रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा नेता म्हणून ओळख मिळाली होती. सुधीर जोशी आणि मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांना नेहमीच मदत केली.
सुधीर जोशी हे 1972 मध्ये मुंबईचे महापौर होते. त्यानंतर ते विधानसभा, विधानपरिषद या विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य देखील राहिले आहेत.
शिवसेना-भाजप युतीच्या काळात राज्याचे शिक्षणमंत्री म्हणून सुधीर जोशींच्या कामाचं कौतूक करण्यात आलं होतं. सुधीर जोशी यांना हाडाचा शिवसैनिक असंही म्हटलं जातं.
युती सरकारचा मुख्यमंत्री करण्याच्या वेळेस सुधीर जोशी आणि मनोहर जोशी यांची नावं चर्चेत होती. अशावेळी बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींना मुख्यमंत्री बनवलं. हा किस्सा राज्याच्या राजकारणात प्रसिद्ध आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या स्थापनेबरोबर शिवसेनेला जनमाणसात लोकप्रिय करण्यात सुधीर जोशींचा वाटा मोठा आहे. मुंबईत शिवसेनेच्या वर्चस्वाला कारणीभूत चेहऱ्यांमध्ये सुधीर जोशींचा समावेश होतो.
महत्त्वाच्या बातम्या –
तो बँजो वाजवत राहिला अन् शिकारी कोल्हा फक्त ऐकतच राहिला; तुफान शेअर होतोय व्हिडीओ
स्वप्न भंगलं अन् चौफेर फटकेबाजी करणारा MR 360 भर मैदानात ढसाढसा रडला!
किरीट सोमय्यांना अटक होणार?, संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला
तरूणांना नोकरीची सुवर्णसंधी; ‘ही’ दिग्गज IT कंपनी देणार 55 हजार जणांना नोकरी
तुमची लाडकी Wagon R येतेय नव्या रूपात; जाणून घ्या फिचर्स