‘तुटेल एवढं ताणू नये’; शरद पवारांचा राज्य सरकारला सूचक सल्ला

नाशिक | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानं राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करावे अशी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र, विलीनीकरण तात्काळ शक्य नसल्याचं राज्य सरकारनं म्हटलं आहे. त्यामुळे हे आंदोलन अद्याप सुरुच आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर पुकारलेला संप दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहे, प्रवाशांची कोंडी होत आहे. त्यांना प्रवासासाठी अडचणी येत आहेत.

आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला सूचक इशारा दिला आहे. सध्या राज्याची आर्थिक स्थिती गंभीर आहे. मागण्या मान्य करणाऱ्यांनीही मागण्यांमागची भावना समजून घ्यावी. मागण्या मान्य करण्यासाठी तुटेल एवढं ताणू नका, असा खोचक सल्ला शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.

राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या वादात प्रवाशांचे कोंडी होत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारनं आत खासगी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या बसेस आणि मालवाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांना प्रवाशांची ने-आण करण्याची परवानगी दिली आहे.

ऐन दिवाळीच्या मुहुर्तावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे.

राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या वादात प्रवाशांची कोंडी होत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारनं आत खासगी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या बसेस आणि मालवाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांना प्रवाशांची ने-आण करण्याची परवानगी दिली आहे.

उच्च न्यायालयानं महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी समजण्यात यावं म्हणून समिती स्थापन केली आहे. मात्र अद्याप कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘…म्हणून राज्यात इंधन दर कमी होणार नाही’; अजित पवारांनी सांगितलं कारण

  ‘पुन्हा गुजरात कनेक्शन’; नवाब मलिकांच्या नव्या ट्विटनं खळबळ

  ‘जोपर्यंत कंगना नाक घासून माफी मागत नाही, तोपर्यंत तिला…’; ‘या’ मंत्र्याचा कंगनावर हल्लाबोल

  थंडीतही पाऊस; पुढील चार दिवस ‘या’ भागात कोसळणार पाऊस,

  “शिवराय खऱ्या अर्थाने बाबासाहेबांमुळेच समजले “