‘जराही लाज वाटत नाही का?’, अंडरवियर जाहिरातीमुळे वरुण धवन वादाच्या भोवऱ्यात

मुंबई | बॉलिवूड मधील कलाकार असून वादाच्या भोवऱ्यात अडकला नसेल, असं क्वचितच घडलं असेल. कलाकार आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सतत कोणत्या न कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात.

अशातच आता अभिनेता वरुण धवन देखील एका जाहिरातीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकताच वरुण धवन लक्स कोझी अंडरवियरच्या जाहिरातीत झळकला. या जाहिरातीनंतर नेटकऱ्यांनी वरुण धवनला धारेवर धरलं आहे.

नेटकरी या जाहिरातीवर समाजात अश्लिलता पसरवण्याचा आरोप करत आहेत. ही जाहिरात पाहून लोक वरुणवर चांगलेच संतापले आहेत. एका युजरने यावर प्रतिक्रिया देताना सवाल केला आहे की, या लोकांना समाजात अश्लिलता पसरवताना जराही लाज वाटत नाही का?

तर दुसऱ्या एका युजरने कमेंट करत समाजातील लोकांच्या मानसिकतेवर बोट ठेवलं आहे. तो म्हणाला की, या जाहिरातीत वरुणच्या जागी एखाद्या महिलेने काम केलं असतं तर या समाजाने त्याचा तीव्र विरोध केला असता.

लक्स कोझी अंडरवियरची ही जाहिरात आणखी एका कारणामुळे देखील वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अमूल माचो कंपनीने लक्स कोझी कंपनीवर आपली जाहिरात कॉपी केल्याचा आरोप केला आहे.

2007 साली अमूल माचो कंपनीने टोईंग अंडरवियरची एक जाहिरात केली होती. याच जाहिरातीची कॉपी लक्स कोझी कंपनीने केली असल्याचा आरोप, अमूल माचो कंपनीने केला आहे. अॅडवर्टायजिंग स्टॅंडर्डस कौंसिल ऑफ इंडियाकडे यासंदर्भात अमूल माचो कंपनीने तक्रार केली आहे.

अशाप्रकारे वरुणची ही जाहिरात चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वरुण धवन यापूर्वी देखील वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोल झाला आहे. अनेकवेळा वरुण देखील ट्रोलर्सला सणसणीत उत्तर देताना दिसतो.

महत्वाच्या बातम्या-

“सिद्धार्थचा मृत्यू ह्रदयविकारामुळे झाला नाही, त्यादिवशी त्याच्या गाडीच्या काचा देखील फुटल्या होत्या”

‘आर्यनने मुलींना डेट करावे, ड्रग्ज घ्यावेत, सेक्स करावा’; मुलाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे शाहरुख पुन्हा चर्चेत

कचऱ्यावाल्यानी वाचवला चिमुकल्याचा जीव, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ

मासे खायला मिळाले नाही म्हणून कुत्र्याने मालकासोबत जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

शाईनिंग करत स्टंट करायला गेला अन्…,पाहा व्हिडीओ