डाॅ. अमोल कोल्हे राजकारणातून निवृत्त होणार?, फेसबुक पोस्टनं गूढ वाढलं

पुणे | अभिनय क्षेत्रातून राजकारणात आलेल्या डाॅ. अमोल कोल्हे यांचा राजकीय प्रवास सर्वज्ञात आहे. अशातच आता खासदार अमोल कोल्हे यांनी फेसबुकवरून केलेल्या पोस्टमुळे आता राजकारणात एकच खळबळ उडाल्याचं दिसून येतंय.

अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आयुष्यात घेतलेल्या निर्णयावर फेरविचार करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी कोल्हे यांनी ‘ही सिंहावलोकनाची वेळ’ असल्याचं सांगत फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

अमोल कोल्हे यांच्या या फेसबुक पोस्टमुळे आता राजकारणात चर्चांना उधाण आल्याचं दिसून येतंय. डॅा. अमोल कोल्हे राजकारणातून निवृत्त होणार?, असा सवाल देखील आता राजकीय वर्तुळात उपस्थित होताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो. या काळात काही टोकाचे निर्णय देखील घेतले. तर काही अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आला आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

थोडा शारीरिक आलाय तर बराचसा मानसिक थकवा देखील जाणवू लागलाय. शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी थोडं मनन आणि थोडं चिंतन हवं, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

आपण घेतलेल्या निर्णयांचा विचार व्हायला हवा आणि कदाचित फेरविचार सुद्धा व्हायला हवा. त्यासाठीच मी एकांतवासात जात असल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे.

एकांतवासात जात असल्याने काही काळ संपर्क होणार नाही. त्यामुळे नव्या जोमाने आणि नव्या जोशाने पुन्हा लवकरच भेटू, असंही अमोल कोल्हे फेसबुक पोस्टमधून म्हणाले आहेत.

फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही, अशी टीप देखील त्यांनी यावेळी लिहिली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आता अमोल कोल्हे यांच्या राजकीय वाटचालीबद्दल गूढ वाढल्याचं देखील दिसून येतंय.

कोरोना काळात अमोल कोल्हे यांनी शिरूर तालुक्यात अनेक मोठमोठी कामं केली आहेत. मात्र, विरोधकांनी अमोल कोल्हे काम करत नसल्याची टीका वारंवार करत होते. त्यावेळी अमोल कोल्हे यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिलंं होतं.

दरम्यान, नुकतंच अमोल कोल्हे यांनी बाहुबली या चित्रपटाच्या डबिंगसाठी आवाज देखील दिला होता. त्यावेळी त्यांनी सर्व प्रेक्षकांचे आभार देखील मानले होते. त्यानंतर त्यांनी एकांतवासात निर्णय घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘त्यावेळी माझी बायको नातवंडांसह दिवसभर…’; छगन भुजबळांनी दिला आठवणींना उजाळा

गोपीचंद पडळकरांची गाडी फोडली; भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

भारताचं आव्हान संपुष्टात! टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर

“परमबीर सिंह यांना भाजपने गायब केलं, त्यांचं शेवटचं लोकेशन…”

“मला 24 तासांपैकी 2 तास उचक्या लागतात, माझं एवढं नाव घेतलं जातं”