‘तुमच्यापेक्षाही घाण शिव्या आम्हाला देता येतात’; राजू शेट्टींचा थेट इशारा

सोलापूर | गेल्या 12 दिवसांपासून सोलापुरातील काँग्रेस भवनासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांना थकित ऊस बिलासंदर्भात हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

सध्या मातोश्री साखर करखान्याचा कारभार माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्याकडे आहे. या आंदोलनावर तोडगा निघावा यासाठी काही शेतकरी सिद्धराम म्हेत्रे यांच्याकडे चर्चा करण्यासाठी गेले होते.

त्यावेळी शेतकऱ्यांशी बोसताना सिद्धराम म्हेत्रे यांना राग अनावर झाला आणि त्यांनी शेतकऱ्याला शिवीगाळ केली. त्याचा एक व्हिडीओ देखील सध्या व्हायरल झाला आहे.

सिद्धराम म्हेत्रे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सिद्धराम म्हेत्रे यांना थेट इशारा दिला आहे. आमच्या घामाचा मोबदला मागायला जाणाऱ्या शेतकऱ्याला शिव्या दिल्या जातात, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.

शिव्याच देयच्या झाल्या तर त्यांच्यापेक्षा जास्त घाण शिव्या आम्हालाही देता येतात. मात्र, आमची ती संस्कृती नाही, असंही राजू शेट्टी यावेळी म्हणाले आहेत.

सिद्धराम म्हेत्रे यांच्यावरून लक्षात येतंय की अक्कलकोटची संस्कृती कुठल्या थराला गेली आहे, असं म्हणत राजू शेट्टी यांनी सिद्धराम म्हेत्रे यांचा समाचार घेतला आहे.

सोलापुरातील काँग्रेस भवनासमोर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राजू शेट्टी आहे होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर देखील घणाघाती टीका केली आहे.

गुंडाप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात टोळीयुद्ध सुरू आहे. त्यामुळे जनतेच्या मुळ मुद्द्याकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढताना दिसत आहे, पण महाविकास आघाडीमधील नेते यावर काहीच बोलत नाही, असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत.

बिघडलेल्या नटांची पोरं गांजा ओढतात, त्यावर सर्वांच लक्ष आहे. मात्र, इथं आंदोलन करणाऱ्या शेतकरीकडे लक्ष देयला सरकारला वेळ नाही, असा टीका देखील राजू शेट्टी यांनी केली आहे.

दरम्यान, ऐन दिवाळीच्या काळात शेतकरी आंदोलन करत आहे. मात्र पोलीस त्यांच्यावरच कारवाई करत आहे. ही शरमेची गोष्ट असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘त्यावेळी माझी बायको नातवंडांसह दिवसभर…’; छगन भुजबळांनी दिला आठवणींना उजाळा

गोपीचंद पडळकरांची गाडी फोडली; भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

भारताचं आव्हान संपुष्टात! टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर

“परमबीर सिंह यांना भाजपने गायब केलं, त्यांचं शेवटचं लोकेशन…”

“मला 24 तासांपैकी 2 तास उचक्या लागतात, माझं एवढं नाव घेतलं जातं”