मुख्यमंत्री एमबीए आहेत, याचा अर्थ असा की…; अमोल कोल्हेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

पाथरी : कामंच केली नाही म्हणून महाजनादेश यात्रेत पोलीस बंदोबस्त ठेवावा लागत आहे. मुख्यमंत्री एमबीए आहेत. त्यांच्या पदवीचा आदर करुन सांगतो आज ती पदवी म्हणजे ‘महाबोलबच्चन यात्रा’ झाली आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

पाथरीच्या जाहीर सभेत त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली, अमोल कोल्हे म्हणाले की, 166 हजार भगिनींच्या कपाळावरचे कुंकु पुसले गेले आहे. मग मुख्यमंत्री कुणावर 302 चा गुन्हा कुणावर दाखल करायचा असा सवाल करत प्रत्येक बाबतीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने सरकारने पुसलीय, अशी टीका त्यांनी केली.

प्रत्येक बाबतीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार करतंय.त्यांना शेतकऱ्यांच्या भावनेचं काहीही देणेघेणे नाही. आज आपण सुपात आहोत उद्या मंदीमुळे जात्यात जाणार आहोत हे लक्षात घ्या असे आवाहनही डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

दरम्यान, सरकारच्या विरोधात कोण बोलायला लागलं की लगेच सीबीआय, ईडीचा घडीबुवा अंगावर सोडला जातोय. सध्या हुकुमशाही सुरु आहे हे लक्षात घ्या, असा इशाराही कोल्हेंनी दिला.

महत्वाच्या बातम्या-

-संंजय बांगर यांना हटवून भारतीय फलंदाजीच्या प्रशिक्षकपदी ‘यांची’ निवड

-समाजकंटकांना पोलीस ठोकणार की मी ठोकू???- नितीन नांदगावकर

-…यापुढे राष्ट्रवादीच्या सभेत ‘हे’ दोन झेंडे राहतील- अजित पवार

-भारताच्या नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरीवर ‘वाडा’ची बंदीची कारवाई!

-बालाकोट हवाई हल्ल्याचा थरार पडद्यावर दिसणार!