मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पीक विमा कंपन्यांवर कारवाई करण्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे. पीक विमा कंपन्यांकडे शेतकऱ्यांचे 2 हजार कोटी रुपये आहेत. सरकारने हा पैसा शेतकऱ्यांना द्यावा आणि विमा कंपन्यांवर कारवाई करावी, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली आहे.
मागील वर्षी शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी 1 कोटी 44 लाख अर्ज भरले. यापैकी 54 लाख पात्र ठरवले, तर 90 लाख शेतकरी अपात्र ठरवले गेले. त्यांचे 2 हजार कोटी रूपये विमा कंपन्यांकडे आहेत. ही योजना प्रधानमंत्री फसल योजना असून ती ‘विमा कंपनी बचाव योजना’ नाही, अशी माहिती शिवसेनेच्या सर्व खासदारांनी पंतप्रधानांना भेटून दिली आहे.
सरकार दुष्काळ जाहीर करते, मग हा दुष्काळ विमा कंपन्यांना का दिसत नाही? असा सवाल करत कंपन्यांनी पैसे देण्याचा वेग वाढवला नाही तर पुन्हा आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा शेतकऱ्यांना मिळायला हवा. 10 लाख शेतकऱ्यांना 960 कोटी रूपये शिवसेनेमुळे मिळाले आहेत. शेतकऱ्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांची आता झाडाझडती घेण्याची वेळ आली आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पक्षाने केलेल्या सर्वेक्षणानुसार पीक विमा कंपन्याकडे 2188.92 कोटींची रक्कम थकवल्याची माहिती शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी दिली आहे.
दरम्यान, याआधीही पीक विमा कंपन्याविरोधात शिवसेनेने अंदोलन केलं होतं. आता पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
“९० लाख शेतकरी जे अपात्र ठरवले गेले त्यांच्यासाठी तरतूद असलेली २ हजार कोटी रुपयांची रक्कम पीक विमा कंपन्यांकडे नफा म्हणुन जमा झाली आहे.”
– शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे. pic.twitter.com/O2XXypd6Tx— ShivSena – शिवसेना (@ShivSena) August 23, 2019
“शिवसेनेने पीक विम्याचा प्रश्न हाती घेतल्यानंतर १० लाख शेतकर्यांना ९६० कोटी रूपयांची नुकसानभरपाई मिळाली.”
– शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे pic.twitter.com/BU1Xxc5SfW— ShivSena – शिवसेना (@ShivSena) August 23, 2019
महत्वाच्या बातम्या-
-मुख्यमंत्री एमबीए आहेत, याचा अर्थ असा की…; अमोल कोल्हेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
-संंजय बांगर यांना हटवून भारतीय फलंदाजीच्या प्रशिक्षकपदी ‘यांची’ निवड
-समाजकंटकांना पोलीस ठोकणार की मी ठोकू???- नितीन नांदगावकर
-…यापुढे राष्ट्रवादीच्या सभेत ‘हे’ दोन झेंडे राहतील- अजित पवार
-भारताच्या नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरीवर ‘वाडा’ची बंदीची कारवाई!