डॉ. प्रकाश आमटेंची कॅन्सरशी झुंज; तब्येतीबाबत ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

पुणे | जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना कॅन्सरचं निदान झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. त्यात प्रकाश आमटे यांना न्यूमोनियाची लागण झाल्याची अपडेट देखील समोर आली आहे.

प्रकाश आमटे यांना 10 दिवसांपूर्वीच न्यूमोनिया झाला होता. त्यानंतर आता प्रकाश आमटेंना हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सरचं निदान झालं आहे.

गेल्या 10 दिवसांपासून डॉ. प्रकाश आमटे यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुण्यातील दीनानाथ रूग्णालयात प्रकाश आमटेंवर उपचार सुरू आहेत.

दिवंगत जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून उभ्या असलेल्या लोकबिरादरी प्रकल्पातून आमटे कुटुंबीयांची चौथी पीढी आदिवासींना सेवा देत आहे.

वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून लाखोंची कमाई करण्याची संधी असताना डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी आदिवासींना सेवा देण्याचा निर्णय घेतला.

मृत्यूमुखी पडणाऱ्या अनेक आदिवासींसाठी प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांची सेवा कामी आली.

दरम्यान, प्रकाश आमटे यांना ब्लड कॅन्सरचं निदान झाल्याची महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. तर डॉ. प्रकाश आमटे यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

सदाभाऊ खोत यांच्याकडून अखेरच्या क्षणी माघार; विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार?

“मुख्यमंत्री वेळच देत नाहीत, आमचा एकच आधार ते म्हणजे अजित पवार”

‘अजितदादा परत आमच्यासोबत या’; भाजप नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

“उद्धव ठाकरेंना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा”

मोठी बातमी! ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाला ड्रग्ज घेताना अटक