आपल्या बहारदार कामाचा ठसा उमवणारा नेता काळाच्या पडद्याआड- गिरीश बापट

नवी दिल्ली :  माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले जेटलींनी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यावर भाजप खासदार गिरीश बापट यांनी शोक व्यक्त केला आहे.

अर्थमंत्री म्हणून त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले होते. जेटलींनी राजकारणासह साहित्य, अर्थकारण, वकीली अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा उत्तमप्रकारे ठसा उमटवला आहे, असं गिरीश बापट म्हणाले आहेत.

मितभाषी आणि कार्यतत्पर अशी त्यांची ख्याती होती. ईश्वर त्यांच्या आत्म्यास व त्यांना शांती देवो, अशा शब्दात गिरीश बापट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, पंतप्रधानांसह अनेक महत्वाच्या नेत्यांनी जेटलींना आदरांजली वाहिली आहे.

महत्वाच्या बातम्या-