नाशिक | डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खुनाला अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने मूर्त स्वरूप दिलं गेलं आहे. त्यांचा खून करून मृतदेह जाळला. त्यांच्या मोबाईलमधील माहिती डिलिट केल्याचं कळतंय.
पोलिसांना मोबाइलमधून माहिती मिळाली असून, त्यातून बरंच सत्य बाहेर आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे घटना घडली त्या दिवशी रात्री संदीप आणि त्याच्या साथीदाराचं लोकेशन घटनास्थळावर आढळलं आहे. आता या प्रकरणी पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीप वाजेचे विवाह्यबाह्य संबंध होते. त्याला दुसरे लग्न करायचे होते. त्यामुळे त्याला डॉ. सुवर्णा वाजे यांचा अडथळा वाटायचा.
संदीपच्या विवाह्यबाह्य संबंधाची डॉ. सुवर्णा वाजे यांना माहिती होती. त्यांनी संदीपला घटस्फोट देण्यासाठी 50 लाख रुपयांची मागणी केली होती. शिवाय संदीपने काही जमीन विकली होती. त्यातून त्याच्याकडे कोट्यवधी रुपये आले होते. यातले तीन ते साडेतीन कोटी रुपये डॉ. सुवर्णा वाजे यांना द्यावे लागले असते. त्याला हे पैसे त्यांना द्यायचे नव्हते. त्यामुळे संदीपने डॉ. वाजे यांना संपवल्याचे समोर येत आहे.
डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून झाला. त्या दिवशी त्यांचे पती संदीप सोबत एकूण 14 वेळा संभाषण झाल्याचं समोर आलंय. शिवाय संदीपविरोधात डॉ. सुवर्णा वाजे यांनी आपल्या क्लिनिमध्ये लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळाली आहे. त्यामुळे हे प्रकरण अतिशय ठळकपणे समोर आलं आहे.
दरम्यान, डॉ. सुवर्णा वाजे या महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. कोविडच्या काळात त्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावली. महापालिकेत स्वतःच्या कार्याची वेगळी छाप पाडली. त्यामुळे पालिकेमध्ये त्यांचा आदरयुक्त दबदबा होता.
25 जानेवारी रोजीही त्यांनी ‘ओपीडी’मध्ये काम केलं. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कसलंही टेन्शन नव्हतं. यादिवशी बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी शेवटचा फोन पती संदीपलाच केल्याचं समोर आलं. त्यावरून पोलिसांनी तपासाला गती दिली आणि मास्टरमाईंड असलेल्या संदीप वाजेलाच बेड्या ठोकल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी भाऊ वाटतो, कारण…”
“सनम हम तो डुबेंगे, पर तुझे भी लेकर डूबेंगे”
मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र, दिल्या ‘या’ सूचना
‘चौकशी होणार कळल्यामुळे संजय राऊत सैरभैर झालेत, त्यांना आवरा’