बंगला, पगार ते सुरक्षा; राष्ट्रपती झाल्यानंतर द्रौपदी मुर्मूंना मिळणार ‘या’ सुविधा

नवी दिल्ली | देशातील सर्व विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव करत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू देशाच्या 15व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होण्याचा मान द्रौपदी मुर्मूंना मिळाला आहे.

राष्ट्रपतिपदी विराजमान झाल्यानंतर द्रौपदी मुर्मूंना अनेक सुविधा मिळणार आहेत. बंगला, पगार ते सुरक्षा अशा अनेक सुविधा देशाच्या राष्ट्रपतींना मिळत असतात.

भारताचे राष्ट्रपती देशातील सर्वाधिक पगार घेणारे राष्ट्रपती असतात. शपथविधीनंतर द्रौपदी मुर्मूंना महिन्याला 5 लाख रूपये पगार मिळणार आहे. मात्र, यातील बरीच रक्कम ही आयकर भरण्यात जाते.

देशाच्या तिन्ही दलांमधील सर्वोत्तम जवानांवर राष्ट्रपतींची सुरक्षा सोपवली जाते. भारतीय लष्कराचं एलिट युनिट राष्ट्रपतींचं बॉडिगार्ड म्हणून तैनात असतं.

राष्ट्रपतींना प्रिमियम कार दिल्या जातात. राष्ट्रपतींना दिल्या जाणाऱ्या सर्व कार बुलेटप्रुफ आणि शॉकप्रुफ देखील असतात. तसेच राष्ट्रपतींच्या कारला लायसन्स प्लेटही नसते.

राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती भवन, प्रेसिडेंट इस्टेट, नवी दिल्ली हे द्रौपदी मुर्मूंचे निवासस्थान असणार आहे. 1929 साली बांधण्यात आलेल्या या राष्ट्रपती भवनाच्या इमारतीत 340 खोल्या असून यात राष्ट्रपतींचे घर, पाहुण्यांसाठी खोल्या व इतर कार्यालही आहेत.

दरम्यान, राष्ट्रपतींना सुट्टीवर जाण्यासाठी हैद्राबादमध्ये राष्ट्रपती निलायाम व शिमल्यात मशोब्रामध्ये द रिट्रिट बिल्डिंग देखील आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अंबादास दानवेंच्या आरोपानंतर एकनाथ शिंदेंचा खळबळजनक खुलासा

“का लोकांची घरं बरबाद करताय चित्राताई, उद्या तुम्ही ब्ल्यू फिल्म टाकाल अन्…”

“धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आलीये”

सर्वात मोठी बातमी! राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मूंचा विजय

राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याला ईडीचा झटका; केली मोठी कारवाई