मुंबई | शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि मराठा आरक्षणातील मोठा आवाज असलेले माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे पुणे मुंबई महामार्गावर (Mumbai-Pune Express Way) अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठा आरक्षणचा आवाज हरपला अशी हळहळ व्यक्त केली गेली.
त्यांच्या अपघातानंतर शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे (Dr. Jyoti Mete) यांनी त्यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. त्यांचा अपघात हा घडवून आणला होता, असा त्यांचा दावा आहे.
त्यांच्या अपघातप्रकरणी त्यांच्या ड्रायवरचे समाधान वाघमारे (Samadhan Waghmare) याचे एक वक्तव्य आले आहे. शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटिव्ही फूटेज तपासा, त्यातून बऱ्याच गोष्टी बाहेर पडतील असे वाघमारे म्हणाला आहे.
मेटे यांच्या अपाघाताअगोदर (दि. 3 ऑगस्ट) रोजी दोन गाड्यांनी त्यांच्या गाडीचा दोन किलोमीटर पर्यंत पाठलाग केला होता. त्यातील एक गाडी त्यांच्या गाडीच्या मागे आणि एक पुढे असे चालत होत्या आणि मागची गाडी सतत त्यांच्या गाडीला कट मारुन जात होती.
मेटे यांच्या गाडीचा अपघात कशामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. त्यांच्या अपघातावर आता वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आरोप केले आहेत.
3 ऑगस्ट रोजी ते मुंबईला येत असताना मागून भरधाव येणाऱ्या गाडीने त्यांच्या गाडीला दोनदा कट मारला. त्यावेळी समाधान वाघमारे याने गाडी थांबविण्यासाठी मेटेंना विचारले होते. पण त्यांनी त्यावेळी त्याकडे दुर्लश केले.
अपघाताच्या वेळी समाधान वाघमारे रजेवर होता. त्यावेळी मेटे यांची गाडी बदली ड्रायवर चालवत होता. त्यावेळी हा अपघात घडला. मी जर त्यावेळी रजेवर नसतो, तर स्वत:चा जीव देऊन साहेबांचा जीव वाचविला असता, असे वाघमारे म्हणाला.
मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती यांनी देखील त्यांना मिळालेल्या अर्धवट माहिती आणि अपघातावर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे मेटे यांचे अपघाती निधन वेगळे वळण घेत आहे. त्याचे पुढे काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘दोन बायका अन् अनुराग कश्यपचे ऐका’
उद्यनराजेंनी तोंडाने भरवला पेढा…
‘आले रे आले, गद्दार आले’, ‘पन्नास खोके, एकदम ओके’
“शरद पोंक्षे आतंकवादी, नथुरामाची औलाद आहे”
‘जेलवारीसाठी तयार राहा’, भाजप नेत्याच्या इशाऱ्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ