मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. शिंदे व समर्थक आमदारांच्या बंडाळीनंतर राजकीय हालचालींना वेग आला असताना सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.
शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. अर्जुन खोतकरांच्या सहकारी साखर कारखान्याची जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.
अर्जुन खोतकर यांची जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची जमीन ईडीने जप्त केली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच ईडीने या साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश दिले होते.
गेल्या अनेक दिवसांपासून ईडीकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत होती. अखेर ईडीने आज जप्तीची कारवाई केली आहे.
ईडीने सहकारी साखर कारखान्याची जमीन, इमारत व प्लांट जप्त केले आहेत. इतकंच नाही तर ईडीने कारखान्याची यंत्रसामग्री देखील जप्त केली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी संबधित प्रकरणात पीएमएलए अंतर्गत ही कारवाई केली असल्याची माहिती ईडीने दिली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमुळे आधीच शिवसेनेत फुट पडलेली पाहायला मिळत आहे. त्यात अर्जुन खोतकरांवर झालेली कारवाई शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय! गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लिन चीट
‘स्वत:चा मुलगा खासदार आहे त्याचं काय’, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल
“बंडखोर आमदारांना पश्चिम बंगालमध्ये पाठवा, आम्ही योग्य तो पाहुणचार करू”
शिवसेनेनं केलेल्या ‘या’ मागणीमुळे एकनाथ शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या
“महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही कारण…”