शाळा पुन्हा बंद होणार का?; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई | कोरोना रुग्णवाढीमुळे चिंता वाढली पण काळजी घेऊन शाळा (Maharashtra School) सुरु ठेवू, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडयांनी दिली आहे.

15 जूनपासून शाळा सुरु होणार आहे. शाळांसाठी एसओपी जारी करण्यात येईल. शाळांमध्ये मास्कसक्ती करायची की नाही याचा निर्णय काही दिवसात घेण्यात येईल. तसेच शिक्षण विभाग शाळांकरता नवी कोविड नियमावली जारी करणार आहे असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

कोरोनामुळे शाळा दीर्घ काळ बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान झालं आहे. विद्यार्थ्यांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याकरता अवघे काही दिवस राहिले आहेत.अशात पुन्हा कोराना रूग्णसंख्या वाढत असल्याचं दिसतंय.

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,270 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,24,692 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“घराचा पत्ता लोक कल्याण मार्ग ठेवल्याने लोकांचं कल्याण होत नाही” 

केकेच्या निधनानंतर गायिकेचा धक्कादायक खुलासा! 

“मला देशात एक मजबूत विरोधी पक्ष हवाय, मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही” 

’15 दिवस वाट पाहून…’; वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य 

दहावी, बारावीच्या निकालाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती!