मोठी बातमी! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढत आहे. आता भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांना कोरोनाची लागण (Corona Virus) झाल्याची माहिती आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली. तसेच त्यांनी माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी” असं फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,270 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,24,692 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, दिग्दर्शक करण जोहर याच्या 50 व्या वाढदिवसाची पार्टी एक सुपर-स्प्रेडर इव्हेंट ठरली आहे. कारण जवळपास 55 स्टार कलाकार पाहुण्यांना कोविड-19 ची लागण झाली आहे. करण जोहर याच्या पार्टीत कोरोनाचा स्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

या पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सहभागी झाले होते. त्यानंतर 1 जून रोजी कार्तिक आर्यन आणि कतरिना कैफ यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान या पार्टीतील अनेक सेलिब्रेटिना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“घराचा पत्ता लोक कल्याण मार्ग ठेवल्याने लोकांचं कल्याण होत नाही” 

केकेच्या निधनानंतर गायिकेचा धक्कादायक खुलासा! 

“मला देशात एक मजबूत विरोधी पक्ष हवाय, मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही” 

’15 दिवस वाट पाहून…’; वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य 

दहावी, बारावीच्या निकालाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती!