या 5 गोष्टी सांगत पंकजा मुंडेंचं राज्य आणि केंद्रातील भाजप नेत्यांना आव्हान!

बीड |  पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्यासमोर येत आहे आणि तुम्हीही सगळे जण या मी तुमची आतुरतेने वाट पाहत आहे, अशी फेसबुक पोस्ट लिहून पंकजा यांनी त्यांच्या समर्थकांना साद घातली. ठरल्याप्रमाणे आज गोपीनाथगडावर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी स्वाभिमान दिन पार पडला. यावेळी पंकजा मुंडे यांनी अतिषय आक्रमक तसंच सूचक भाषण करत राज्यातील आणि केंद्रातील भाजप नेत्यांना आव्हान दिलं आहे.

1. भाजप माझ्या बापाचा पक्ष आहे. माझ्या बापानं अनेक खस्ता खात शेठजी भटजीचा पक्ष हा बहुजन वर्गापर्यंत नेला. मी पक्ष सोडणार नाही. आता निर्णय भाजपनं घ्यायचाय…

2. पक्षात लोकशाही पद्धतीनं निर्णय घ्यावे, असं सांगताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

3. लोक म्हणतात की नवीन पक्ष काढा. पण सध्या मी पक्ष सोडणार नाही. नवीन पक्ष काढायचा की नाही हे नंतर ठरवू…

4. गेली अनेक दिवस माझी घालमेल होतीये. पण माझ्या अंगात गोपीनाथ मुंडेंचं रक्त आहे. मी संघर्षाला घाबरणारी नाहीये. आणि तुम्हीही घाबरून जाऊ नका… मुख्यमंत्री माझा भाऊ आहे (उद्धव ठाकरे).

5. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून वज्रमूठ आणि मशाल घेऊन राज्यभर दौरा करणार, असं सांगत फडणवीसांच्या विरोधातील नाराज नेत्यांचं प्रतिनिधित्व त्या करणार असल्याचे सूचक संकेत त्यांनी यावेळी आपल्या भाषणात दिले.

महत्त्वाच्या बातम्या-