…तर 105 आमदारांचे 50 व्हायला वेळ लागणार नाही; एकनाथ खडसेंचा पक्षनेतृत्वाला इशारा

मुंबई |  पक्षाने सातत्याने डावलल्यानंतर आणि आता विधान परिषदेची उमेदवारी न दिल्याने  एकनाथ खडसे चांगलेच चवताळून उठले आहेत. पक्षात जर हे असंच सुरू राहिलं तर 105 आमदारांचे 50 आमदार आमदार व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा एकनाथ खडसे यांनी पक्ष नेतृत्वाला दिला आहे.

विरोधी पक्षात एकटं असताना 123 आमदार निवडून आणले. महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री आणला. आणि आता सत्ता, पैसा सगळं असून 105 आमदार आले. 105 आमदार येण्याला हीच प्रवृत्ती कारणीभूत ठरली. विरोधी पक्षात बसायची वेळही याच कारणामुळे आली. पुढे कष्टानं जावं लागणार आहे, नाहीतर 105 आमदारांचे 50 आमदार व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा खडसेंनी दिला आहे.

सामाजिक समीकरणामध्ये पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे बसत नव्हते का? जुन्या माणसांचा जेवढा जनाधार आज आहे, तेवढा नवीन माणसांचा जनाधार आहे का?, असा सवाल विचारत वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांना डावलून तुम्ही अशा पद्धतीनं उपरे अंगावर घेत असाल, जे आम्हाला शिव्या घालतात. जे मोदींना शिव्या घालतात, अशांना घेतल्याचं वाईट वाटतं, असं खडसे म्हणाले.

आम्ही जिवाचं रान करून आज हा पक्ष आज जो झालेला आहे, तो आमच्या ताकदीनं, मेहनतीनं आणि आमचा खारीचा वाटा होता म्हणून झालेला आहे. यांचं काय योगदान आहे पक्षामध्ये? कितीवेळा हे तुरूंगात गेले? कितीवेळा दगड खाल्ले?, असे थेट प्रश्न विचारत खडसेंनी फडणवीसांचं थेट नाव न घेता त्यांच्यावर टीकेचे आसूड ओढले.

महत्वाच्या बातम्या-

-मोदींनी दिलेला आधार उद्योग क्षेत्र कधीही विसरणार नाही- नितीन गडकरी

-पंतप्रधान मोदींच्या आर्थिक पॅकेजनंतर शेअर बाजार उसळला…!

-“उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन शिथील करण्याची हिम्मत दाखवावी”

-मी पक्षाचं काम सुरू केलं तेव्हा ते चड्डीत मुतायचे- एकनाथ खडसे

-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींचा ‘या’ लोकांना लाभ होणार