मुंबई | शिवसेना आणि दसरा मेळावा हे समीकरण गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रात चालत आले आहे. त्यामुळे दसरा मेळावा म्हंटला की मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचे भगवे झेंडे फडकतात.
पण शिवसेेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत अभूकपूर्व बंड केल्याने शिवसेनेला गळती लागली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांचा गट म्हणजेच खरी शिवसेना असा दावा केला आहे.
खरी शिवसेना आमची असल्याने यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर आम्हीच घेणार आहोत, असा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यांनी त्यानुसार मुंबई महापालिकेकडे परवानगी देखील मागितली आहे.
आता एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आपल्याला परवानगी मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे. शिवसेनेने दसरा मेळावा घेण्यासाठी सर्वप्रथम अर्ज केला आहे.
त्यानंतर शिंदे यांच्या गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी महापालिकेकडे मैदानासाठी अर्ज केला होता. पालिकेकडे सध्या दोनही अर्ज प्रलंबित आहेत. पालिका त्यांची छाननी करुन लवकरच निर्णय कळविणार आहे. यावर आता शिंदे यांनी भाष्य केले आहे.
मंगळवारी शिंदे गटाची वांद्र्याला एक बैठक झाली. यावेळी त्यांनी दसरा मेळाव्याचे नियोजन, तयारी आणि शक्तीप्रदर्शनाबाबत चर्चा केली. त्याचबरोबर इतर गोष्टींवर देखील चर्चा करण्यात आली.
या भेटीनंतर शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. आमचा दसरा मेळावा होणारच, असा विश्वास त्यांनी यावेळी दर्शविला. तसेच स्थळ अद्याप निश्चित नाही पण आपण दसरा मेळावा घेणार असल्याचे नक्की आहे, असे पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
वेदांता फॉस्कॉन गेल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पंतप्रधानांना फोन, म्हणाले…
उत्तर प्रदेशात भाषणादरम्यान अमित शहांची जीभ घसरली, म्हणाले…
दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; खाद्यतेलांच्या किंमतीत घट, जाणून घ्या सविस्तर वृत्त
मविआचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात शिंदे सरकारचा मोठा निर्णय; देशमुखांच्या अडचणी वाढल्या
बंगालमध्ये मोर्च्यादरम्यान भाजपचा मोठा हिंसाचार; पोलिसांचा बळाचा वापर