छगन भुजबळांच्या सरस्वती वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांची प्रहिली प्रतिक्रिया

मुंबई | दोन दिवसांपू्र्वी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा (Akhil Bhartiya Mahatma Phule Samata Parishad) कार्यक्रम येथे पार पडला. यावेळी राष्ट्रावादीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी सरस्वती आणि देवी शारदा यांच्यावर भाष्य केले होते.

महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सरस्वती आणि देवी शारदेचा फोटो काढून टाकावा आणि त्याठिकाणी राष्ट्रपुरुषांचे फोटो लावण्यात यावेत, अशी त्यांनी मागणी केली होती.

महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन मुक्तीची दारे उघडली. सरस्वती आणि शारदा देवी यांनी बहुजनांना शिक्षणापासून दूर ठेवले.

त्यांनी केवळ तीन टक्के लोकांनाच शिक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिमा लावल्या जाऊ नयेत, असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले. त्यावर भाजपच्या नेत्यांनी आणि आमदारांनी आक्षेप घेतला होता.

यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुठलेही फोटो काढले जाणार नाहीत, कुणाला काहीही वाटेल, असे मत एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

नाशिक येथे स्वामीनारायण मंदिराचा उद्धाटन कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पार पडला. त्यावेळी ते माध्यामांसोबत बोलत होते. यावेळी त्यांनी मोजक्या शब्दांत छगन भुजबळ यांच्या मागणीवर पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान पीएफआय (PFI) संघटनेवर झालेली कारवाई योग्य आहे, असे शिंदे म्हणाले. पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे देशासाठी धोकादायक आहेत. म्हणून अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे, असे देखील शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

“आरएसएसवर बंदी घाला” या काँग्रेस खासदाराच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले,

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कारवाईवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मग घ्या ना धौती योग!’ म्हणत आशिष शेलारांचे शिवसेनेला पत्र; वाचा सविस्तर पत्र

टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात

‘पीएफआय’बाबत किरीट सोमय्यांचा मोठा दावा; म्हणाले, या संघटनांना निधी…