आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदे यांनी पोस्ट केली कविता

ठाणे | आज धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्त महाराष्ट्रभरात त्यांच्या पूज्य स्मृतीला अभिवादन केले जात आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांना अभिवादन केले आहे.

आपल्या प्रत्येक भाषणात आणि ठिकठिकाणी एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासोबत आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या नावाचा उल्लेख करतात. ते अभिमानाने आपण त्यांच्या तालमीत तयार झाल्याचे सांगतात.

आज त्यांनी ट्विटरवर चार ओळी पोस्ट करत, त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. धर्मवीर गुरुवर्य स्वर्गीय आनंद दिघे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन अशा शीर्षकाखाली त्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट केली आहे.

उरात भरुनी सदैव आपले स्मरण,

मनामध्ये कोरली आहे कायम आपली शिकवण,

करीतो गुरुवर्य आपल्या तत्वांचे आचरण,

जनसेवेचे व्रत महत्वाचे, नाही राजकारण

अशी पोस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोस्ट केली आहे. आजच्या दिवशी आनंद दिघे हे महाराष्ट्राल सोडून गेले होते. त्यांनी ठाण्यात शिवसेना रुजवली आणि मोठी केली होती.

महत्वाच्या बातम्या – 

“पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता, तर…” उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

मराठा आरक्षणाच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत वाद; वाचा इतिवृत्त

IPS कृष्ण प्रकाश यांची आईच्या निधनावर भावूक पोस्ट “तुझ्याशिवाय मी काहीच नाही”

तब्बल 15 दिवसांनी राजू श्रीवास्तव शुद्धीवर आले, त्यांनी शुद्धीवर येताच म्हंटले…

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबाबत विधानसभेत मोठा निर्णय