मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठ्या घरफोडीचा सामना करावा लागत आहे. ते एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीकांची झोड उठवत आहेत.
दोन दिवसांपूर्वी त्यांनी भाजपला चोरबाजार म्हंटले होते. भाजपचा एककलमी कार्यक्रम आहे, दुसऱ्या पक्षातून आमदार आणि खासदार पळविणे, असेही उद्धव ठाकरे भाजपला म्हणाले होते.
आता पुन्हा एकदा त्यांनी 2019 सालच्या नोव्हेंबर महिन्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीवरुन टोला लगावला आहे.
त्यांनी त्या पहाटेच्या शपथविधीची तुलना स्वत: च्या शिवाजीपार्कवरील शपथविधीसोबत केली. मुंबई इलेक्ट्रिक वर्कस युनियनच्या (Mumbai Electric Works Union) सूवर्ण महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
अनेक मुले अशी आहेत, ज्यांच्यासाठी आपल्या देशात पोषक वातावरण पाहिजे. पण बाकीच्या राजकारण्यांचे म्हणजे सत्तापिपासू राजकारण्याचे कसे असते, लोक मेले तरी चालतील, बेकार राहिले तरी चालतील, पण सत्ता आपल्याकडे राहिली पाहिजे, असे ठाकरे यावेळी म्हणाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, कोंबडी अंड्यावर बसली तर ती पिल्लू तरी देते. पण हे खूर्ची उबवत राहिले तर त्यातून काहीच निघत नाही. सत्ता पाहिजे तर घ्या ना, पण ती कशासाठी पाहिजे, हे पण सांगा, असे ठाकरे म्हणाले.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर (MVA) देखील भाष्य केले. आम्ही ती सोयरीक अधिकृत जूळवून आणली होती. चोरुन मारुन पहाटेचा शपथविधी केला नाही, असे ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
मराठा आरक्षणाच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत वाद; वाचा इतिवृत्त
IPS कृष्ण प्रकाश यांची आईच्या निधनावर भावूक पोस्ट “तुझ्याशिवाय मी काहीच नाही”
तब्बल 15 दिवसांनी राजू श्रीवास्तव शुद्धीवर आले, त्यांनी शुद्धीवर येताच म्हंटले…
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबाबत विधानसभेत मोठा निर्णय
बिल्कीस बानो प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाची गुजरात सरकारला नोटीस