मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करुन पक्षाचे 40 हून जास्त आमदार फोडले. त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती. त्यांनी एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली होती.
त्यांच्या ह्या कारवाईला शिंदे यांच्या गटातून आव्हान करत प्रकरण सर्वोच्च न्यायालायात गेेले होते. शिंदे गटाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्या अधिकारांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
त्यांच्या या खटल्याची उद्या (दि. 03 ऑगस्ट) रोजी न्यायालयात सुनावणी आहे. उद्याच्या निकालात शिवसेनेचे आणि भाजप शिंदे सरकारचे भवित्व्य ठरणार आहे. यावेळी शिंदे यांचे सरकार डावाला लागले आहे.
तसेच राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) शिवसेना पक्षाला पक्ष त्यांचा असल्याचे पूरावे सादर करण्यास सांगितले आहे. शिंदे गटाने आपला गट म्हणजे खरी शिवसेना असल्याचे सांगत शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर देखील दावा केला होता.
आता उद्याच्या निकालापूर्वी एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालायाला (Supreme Court of India) एक पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी न्यायालायाला विनंती केली आहे. खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय घेण्याची मुभा केंद्रीय निवडणूक आयोगाला (Central Election Commission)द्यावी असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.
तसेच शिंदे-फडणवीस सरकारची वैधता, खरी शिवसेना कोणाची, शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर अधिकार कोणाचा, आदी प्रकरणातील न्यायालयासमोरील वाद फेटाळून लावण्याची एकनाथ शिंदे यांनी न्यायालयाला विनंती केली आहे.
आपल्या गटात शिवसेनेचे 40 आमदार आहेत आणि ठाकरेंजवळ 15 आमदार. त्यामुळे शिवसेनेला आमचा गट अवैध ठरविण्याचा अधिकार नसल्याने त्यांची याचिका ग्राह्य धरु नये, असे शिंदे यांनी पत्रात म्हंटले आहे.
सदर याचिकांवर उद्या सरन्यायाधिश एन. व्हि. रमणा (N. V. Ramana), न्यायाधीश कृष्णमुरारी (Justice Krishnamurari) आणि न्यायाधीश हिमा कोहली (Justice Hima Kohali)यांच्या त्रिसदस्यीय पिठासमोर सुनावणी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
“गद्दारांच्या गाड्या फोडेल त्याचा शिवसेना पक्षप्रमुखांच्या हस्ते सत्कार केला जाईल”
“कोण आदित्य ठाकरे, तो फक्त एक आमदार आहे”
संजय राऊतांची एकूण संपत्ती किती?, वाचा सविस्तर
‘फक्त 11 लाखांसाठी का छळ चालवलाय?’, राऊतांवरील कारवाईवर जया बच्चन संतापल्या
भागवतांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले ‘मोहन भागवत मला आदर्श आहेत’