मुंबई | एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे. बंडखोर आमदार त्यांच्या मागणीवर ठाम असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा भावनिक साद घातली आहे.
उद्धव ठाकरेंनी एकिकडे बंडखोर आमदारांना समेटाची हाक दिली आहे तर दुसरीकडे संजय राऊत व आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली आहे.
उद्धव ठाकरे भावनिक साद घालत आहेत तर इतर दोन महत्त्वाच्या नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. यावरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे व त्यांचा बाप काढायचा, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआ सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची. याचा काय अर्थ आहे, असा थेट सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांनी आज शिवसेना मेळाव्यात बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधला. तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंनी आमदारांना समेटाची हाक दिली.
दरम्यान, शिवसेनेच्या या भूमिकेवरून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडी सरकारवर देखील टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रिलायन्स जिओच्या संचालक पदावरून मुकेश अंबानींची पायउतार, आकाश अंबानीकडे सोपवली मोठी जबाबदारी
“घरातील मोठा भाऊ असावा तर तो उद्धव ठाकरेंसारखा असावा”
‘आमदार संपर्कात आहेत तर नावं सांगा’, एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान
‘आदित्यला आक्रमक दाखवण्याचा प्रयत्न, पण कार्टुनमध्येही…’; निलेश राणेंचा टोला
‘आजचा शेवटचा दिवस असेल…’; बंडखोर आमदाराचा गुवाहाटीतून उद्धव ठाकरेंना इशारा