मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मालेगावात (Malegaon) एक सभा झाली. या सभेला तुफान गर्दी जमली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी जोरदार भाषण करत अनेक गोष्टींवर भाष्य केले.
मी मुलाखत देईन त्यादिवशी राज्यात भूकंप होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. आनंद दिघे (Anand Dighe) यांच्याबाबत मोठे राजकारण झाले. त्याचा खुलासा मी लवकरच करणार आहे, असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
त्यांच्यासोबत बंड केलेल्या आमदारांच्या मतदार संघात त्यांचे सध्या दौरे सुरु आहेत. आम्ही चुकलो असतो तर आम्हाला जनतेने समर्थन दिले नसते, असे एकनाथ शिंदे यावेळी मालेगावात म्हणाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांनी देखील आपली पाठ थोपटली आहे. त्यांनी देखील आम्हाला पाठिंबा दिला आहे. तुम्ही चांगले काम करत आहात, तुम्ही लढवय्ये आहात, बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) नाव तुम्ही उज्वल कराल, असे नरेंद्र मोदी एकनाथ शिंदेंना म्हणाल्याचे त्यांनी यावेळी भाषणात सांगितले.
आषाढी एकादशीला मी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची पूजा केली. त्याकरिता भाग्य लागते, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टोला लगावला. पंढरपूरात जमलेल्या वारकऱ्यांनी मला पसंती दिली, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी स्वत: पाडलेल्या महाविकास आघाडी सरकारवर (MVA) देखील टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादीतून (NCP) पराभूत झालेल्या आमदारांना देखील निधी दिला गेला. ज्या काँग्रेस (INC) राष्ट्रवादीसोबत जन्मभर लढलो, त्यांच्यासोबत मुख्यमंत्रीपदासाठी गेले, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचले.
बाळासाहेबांनी हिंदूत्वासोबत कधीच तडजोड केली नाही. परंतु उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला जवळ केले. त्यामुळे आता शिवसेनेच्या विचारांसोबत कोणी गद्दारी केली आणि कोण शिवसेनेचे विचार पुढे घेऊन जात आहेत. ते जनतेला माहीत आहे, असे यावेळी शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
‘राज्यपालांच्या टोपीचा आणि अंत:करणाचा रंग एकच’, शरद पवारांचे राज्यपालांना खडेबोल
राज्यापालांच्या वादग्रस्त वक्तव्याला प्रकाश आंबेडकरांचं समर्थन, म्हणाले…
‘दरवेळी उपलब्ध असलेले फडणवीस आता कुठे गेले?’, सुप्रिया सुळेंची टोलेबाजी
‘कोश्यारींची होशियारी’, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना राज ठाकरेंनी झापलं
मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी बाहेर काढल्यानंतर इथे काहीच पैसा उरणार नाही- राज्यपाल