“कुठल्या तोंडाने सांगू घात झाला, तो पण आपल्या माणसाने केला”

मुंबई | शिवसेनेत झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी धर्मवीर आनंद दीघे (Dharmaveer Anand Dighe) यांना उद्देशून एक भावनिक पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी शिवसेनेच्या पाठीत त्यांच्याच लोकांनी खंजीर खुपसल्याचं म्हटलं आहे.

दीघे साहेब, आज शिवसेनेच्या पाठीत आपल्याच माणसांकडून जो खंजीर खुपसला जातोय, त्यामुळे प्रचंड वेदना होत आहेत. तुम्ही असता, तर त्यांना माफ केले असते का?, असा प्रश्न राजन विचारे यांनी पत्रातून विचारला आहे.

शिवसेनेतील मोठे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde), आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि नेत्यांचे बंड यामुळे शिवसेनेला उतरती कळा लागली आहे. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सुरु असलेली ईडीची कारवाई यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी आहे.

शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी सध्याच्या वस्तुस्थितीवर तीव्र दु:ख व्यक्त करत त्यांनी आनंद दिघे यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे.

आज मी जेवढा अस्वस्थ आहे, तेवढा मी कधीच नव्हतो. आज ज्या घटना घडत आहेत, त्यामुळे फक्त मी नाही, शिवसैनिक नाही, तर सगळा मराठी माणूस अस्वस्थ होत आहे. कुठल्या तोंडाने सांगू घात झाला दिघे साहेब घात झाला.. तो पण आपल्या माणसाने केला,असं विचारे पत्रात लिहितात.

ज्या ठाण्यातून (Thane) शिवसेनेच्या वाढीची नांदी होती. ज्या ठाण्यावर तुम्हाला अभिमान होता, त्याच ठाण्याच्या कपाळावर आज गद्दारीचा (Traitor) शिक्का बसला आहे. छातीवर नाहीतर आपल्या पाठीवर वार झाला आहे, असे विचारे आनंद दिघे यांना पत्रातून सांगत आहेत.

तुम्ही होतात तेव्हा गद्दारांना माफी दिली नाही. आज जर तुम्ही असता, तर त्यांना माफ केले असते का? असा प्रश्न विचारे पत्रातून करत आहेत. आनंदाश्रमात तुम्ही शिवबंधन बाधले होते, ते बंधन आज तुटताना दिसत आहे. आणि तुम्हाला होणाऱ्या वेदना आम्हाला होत आहेत, असे देखील विचारे लिहितात.

आम्ही जीवाची बाजी लावू परंतु शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना ही ज्योत कधिही विझू देणार नाही. आम्ही परत तुमचा शिवसैनिक वाघासारखा उभा करु, असा विश्वास विचारे यांनी आपल्या पत्रातून दिवंगत आनंद दिघे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –

संजय राऊतांच्या अटकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘हे काही शहाणपणाचं नाही’, राज्यपालांविरोधात शरद पवार आक्रमक

एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

राज्यापालांच्या वादग्रस्त वक्तव्याला प्रकाश आंबेडकरांचं समर्थन, म्हणाले…

‘दरवेळी उपलब्ध असलेले फडणवीस आता कुठे गेले?’, सुप्रिया सुळेंची टोलेबाजी