नाशिक | मुंबई शहराला आणि उपनगरांना एक स्वत:चा इतिहास आहे. मुंबईने भारताची जडणघडण पाहिली आहे. किंबहुना मुंबईचा भारताच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. 105 आणि असे कित्येक हुतात्मे देऊन मुंबई (Mumbai) महाराष्ट्राला मिळाली आहे.
अशा ज्वलंत आणि कधीही न झोपणाऱ्या मुंबईबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुंबईतील गुजराती आणि राजस्थानी लोक जर गेले तर मुंबईची आर्थिक राजधानीची ओळख सुद्धा संपेल, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
त्यांच्या या वक्तव्यावर राज्यातील भाजपेत्तर पक्षांनी आगपाखड केली आहे. आता त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी भाष्य केले आहे. त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
राज्यपाल यांच्या टोपीचा रंग आणि त्यांच्या अंतकरणाचा रंग एकच आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. तसेच राष्ट्रवादीचे राज्यात राज्यपालांविरोधात आंदोलन सुरु आहे.
राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आक्रमक आंदोलन करत आहेत. राज्यपलांविरोधात ते तीव्र घोषणाबाजी करत असून त्यांनी त्यांना पदावरुन हटवण्याची देखील मागणी केली आहे.
शरद पवार सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, या राज्यपालांबद्दल काही सांगण्यासारखे उरलेच नाही. त्यांच्याबद्दल काय बोलावे हे सांगणे कठीण झाले आहे, असे शरद पवार म्हणाले.
यापूर्वी राज्यपालांनी महात्मा जोतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्याबद्दल देखील अशाच प्रकारची वादग्रस्त वक्तव्ये केली होती. आताही त्यांचे तशाच प्रकारचे वक्तव्य आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र आणि मुंबई (Maharashtra and Mumbai) सर्व जाती आणि धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन चालणारे राज्य आणि शहर आहे. त्यामुळे मुंबईत जी काही प्रगती झाली, ती सर्व सामान्य माणसांच्या कष्टातून झाली. त्यामुळे त्यांची अशा प्रकारची विधाने काही शहाणपणाची नाहीत, असे शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
“राज्यपालांचं वक्तव्य चुकीचं नाही, मी त्यांच्या विधानाचं समर्थन करतो”
“बहोत हो गया, राज्यपालांना उत्तराखंडला परत पाठवा”
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले…
मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी बाहेर काढल्यानंतर इथे काहीच पैसा उरणार नाही- राज्यपाल
अखेर राज्यपालांकडून ‘त्या’ वक्तव्याचा खुलासा, म्हणाले…