मुंबई | शिवसेनेत दसरा मेळाव्यावरुन सध्या आरोप आणि प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. तसेच शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dashera Melava) घेण्यासाठी दोनही गट शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
शिवसेना आणि शिंदे गटाचे वाद दिवसेंदिवस चिघळत आहेत. कारण गेले दोन महिने शिवसेनेतून एक एक करत अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकारी शिंदे यांच्या गोटात गेले आहेत.
आता शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का देण्याची योजना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आखली आहे. दसरा मेळाव्याच्या अगोदर किंवा दसरा मेळाव्यालाच शिवसेनेला ते मोठा धक्का देणार आहेत.
कारण शिवसेनेचे आणखी मोठे नेते आणि लोकप्रतिनिधी शिंदे यांच्या गोटात सामील होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेला सर्वात मोठा दणका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला ठाण्यात बसला होता.
ठाण्यातील जिल्हाप्रमुखांपासून अनेकांनी शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाण्यातून उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) अस्तित्वच संपल्यासारखे झाले आहे. पण मुंबईत मात्र अद्याप ते हवी तशी फोडाफोडी करु शकले नाहीत.
त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याला ते मुंबईत बंडखोरी करणार, अशा बातम्या आहेत. तसेच स्वत: मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले आहे. मुंबईतील शीतल म्हात्रे (Shital Mhatre) या एकमेव माजी नगरसेविकेने शिंदे गटात प्रवेश केला आहे.
त्यामुळे मुंबईतील इतर नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयत्न शिंदे यांच्या गटाकडून सुरु आहे. भाजप देखील त्यांना मदत करत आहे. मुंबईतील 10 ते 15 नगरसेवक शिंदे यांच्या गटात प्रवेश करतील, असे संकेत आहेत. त्यामुळे येता दसरा मेळावा भरपूर गाजणार हे निश्चित झाले आहे.
महत्वाच्या बातम्या –
लालबागचा राजा सार्वजनिक गणेसोत्सव मंडळाला मुंबई महानगरपालिकेचा साडेतीन लाख दंड; कारण त्यांनी…
पत्राचाळ घोटाळ्यात आपला सहभाग आहे का? शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर
खुशखबर! भारतीय पोस्टात ‘आठवी पास’ तरुणांना नोकरीची संधी
प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधनांवर मोठी टीका; म्हणाले, दारुड्याला दारु पिण्यास…
‘राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रकाश आंबेडकरांचे गंभीर आरोप’