किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई | एसआरएमधून फाईल चोरी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी प्रवीण कलमे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. या प्रकरणी प्रवीण कलमे विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

प्रवीण कलमे देश सोडून गेल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली. प्रवीण कलमे प्रकरणावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर सडकून टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंनी प्रवीण कलमेंच्या तक्रारीवर सहा वेगवेगळे आदेश दिले होते. वेगवेगळे अधिकारी सोमय्या परिवार अनेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या, असं सांगताना किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

प्रवीण कलमे म्हणजे उद्धव ठाकरेंचा उजवा हात, असा घणाघाती आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. तर कलमे म्हणजे अनिल परबांचा चाहता व जितेंद्र आव्हाडांचा सचिन वाझे, असा आरोप देखील किरीट सोमय्यांनी केला आहे.

प्रवीण कलमेंनी सरकारी फाईली चोरल्या. मुंबई पोलिसांनी प्रवीण कलमेंविरोधात लुक आऊट नोटीस काढावी, असंही सोमय्या म्हणाले आहेत.

प्रवीण कलमेंनी एसआरएमधून फाईल चोरल्या आणि त्यांना अटक होऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी फोन केला. मात्र, शेवटी अंत जवळ आला आहे, असा खोचक टोलाही किरीट सोमय्यांनी लगावला.

दरम्यान, आता दुबईत लपलेल्या प्रवीण कलमेंना मुंबई पोलिसांना दुबईहून पकडून कोर्टात दाखल करावच लागेल, असं वक्तव्यही किरीट सोमय्यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“फडणवीसांच्या नावामागे ‘उप’ शब्द लावायला फार जड जातं”

संजय राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शरद पवारांना दुसरा झटका

बंडखोर आमदारांनी मुक्काम ठोकलेल्या गुवाहाटीच्या हॉटेलचं एकूण बिल किती?, आकडा वाचून थक्क व्हाल

टेबलावर चढून नाचणाऱ्या आमदारांना एकनाथ शिंदेंनी झापलं, म्हणाले…