‘हा विजय म्हणजे…’, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

मुंबई | शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. विधानसभा उपाध्यक्षांनी 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या कारवाईसाठी नोटीस बजावल्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापलं.

यानंतर एकनाथ शिंदेंनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली असून सर्वोच्च न्यायालयाकडून बंडखोर आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बंडखोर आमदारांना 12 जुलैपर्यंत अपात्र ठरवता येणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

हा वंदनीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर 11 जुलै रोजी पुढची सुनावणी पार पडणार आहे. तर बंडखोर आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी ही राज्याचीच आहे, असं मत देखील सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.

दरम्यान, शिंदे गटाविरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अनेक बंडखोर आमदारांचे प्रतिकात्मक पुतळे शिवसैनिकांकडून जाळण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा बंडखोर आमदारांना दिलासा

सर्वात मोठी बातमी! महाविकास आघाडी सरकार अल्पमतामध्ये, शिंदे गटानं काढला पाठिंबा

‘आमचं बाळ… लवकरच येणार’, आलिया भट्टने हॉस्पिटलमधला फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…