गुवाहाटीत एकनाथ शिंदेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन; वर्षावर आता ‘इतकेच’ आमदार उरले

मुंबई | शिवसेना नेते आणि मंत्री शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे 37 पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय आणखीही काही आमदार शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याचं समोर येत आहेत.

गुवाहाटीतून सध्या एक व्हिडीओसमोर आला आहे. गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये त्यांनी 42 आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केलं आहे. यावेळी बाळासाहेब ठाकरे आनंद दिघेंच्या नावाने जोरदार घोषणा देण्यात आल्या.

अशात आता नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेच्या शिंदे गटाची आमदार संख्या पन्नासवर पोहोचणार आहे. संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे आपल्या या शिवसेना गटाचं पत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे मुंबईत शिवसेनेचे 17 आमदार अपस्थित असल्याची माहिती समोर आलीये.

आज सकाळी आणखी चार आमदार गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. रामटेकचे शिवसेना समर्थक आशिष जैस्वाल यांच्यासह सदा सरवणकर, दीपक केसरकर, संजय राठोड, मंगेश कुडाळकर हे आमदार आज शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत. त्यानंतर आज एकनाथ शिंदे गटाने दुपारी एकत्र येत शक्तिप्रदर्शन केले.

शिंदे 50 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र संध्याकाळपर्यंत राज्यपालांना देतील, असं बोललं जात होतं. अशात एकनाथ शिंदे यांनी हे शक्तीप्रदर्शन करत आपल्यासोबत सेनेचं बहुसंख्य आमदार असल्याचं दाखवून दिलं आहे.

भाजप राज्यपालांना पत्र लिहून सरकार स्थापनेचा दावा करेल. नव्याने सोमवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे, शिवसेनेचे अनेक बडे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

शिवसेनेच्या बंडखोर आमदाराच्या पत्राने खळबळ; बडवे उल्लेख करत केले अत्यंत गंभीर आरोप 

सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका बसण्याची शक्यता 

शिंदे-भाजप युतीबाबत प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या ट्विटमुळे मोठी खळबळ 

‘तुम्ही ठरवा, आता शिवसेनेची जबाबदारी तुमची’; आमदारांमधील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल 

उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडताच सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस ट्रोल!