मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा पेच सुटला; महाराष्ट्र दिनाला महाविकास आघाडीला गोड बातमी!

मुंबई |   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. 27 मे पूर्वी महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका होणार असल्याची केंद्रीय निवडणूक आयोगाने माहिती दिल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील 9 विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार की नाही? किंवा ती कोरोनाच्या संकटकाळात घ्यावी की नाही? यासंबंधी आज केंद्रिय निवडणूक आयोगाची नवी दिल्लीत एक बैठक पार पडली. या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्त व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

आजच्या बैठकीतून महाराष्ट्राला राजकीय अस्थिरतेचा निकाल लागला असून आता महाविकास आघाडीवरचं संकट टळलं आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी काल केंद्राशी चर्चा करून निवडणूक घेण्यासंबंधी प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर आज केंद्रिय निवडणूक आयोगाची बैठक पार पडली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र दिनाला आज खूप गोड बातमी मिळाली आहे. आम्हाला या निर्णयाचं समाधान आहे. आता यावर कुणीही कोणतंही राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मुकेश अंबानी यांचा कर्मचाऱ्यांना झटका; घेतला हा निर्णय

-ऋषी कपूर यांच्या निधनानंतर केलेलं ट्विट अमिताभ बच्चन यांच्याकडून डिलीट!

-इरफान-ऋषींची एकापाठोपाठ एक एक्झिट; ‘या’ चित्रपटात केलंय एकत्र काम

-गेल्या 24 तासांत देशात 1823 नवे रुग्ण; कोरोनाग्रस्तांची संख्या 33610 वर

-पुण्यातील ‘या’ भागात तीन दिवसांसाठी पुन्हा अतिरिक्त निर्बंध; किराणा, भाजीपाला बंद