मुकेश अंबानी यांचा कर्मचाऱ्यांना झटका; घेतला हा निर्णय

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसमुळे केलेल्या लॉकडाऊनचा फटका देशाची सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला बसला आहे. रिलायन्सने कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपातीची घोषणा केली आहे.

रिलायन्सच्या हायड्रोकार्बन व्यवसायातील कर्मचाऱ्य़ांना पगारकपातीचा फटका बसणार आहे. यामध्ये काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांचा वार्षिक पगार 15 लाखांहून अधिक आहे त्यांच्या पगारामध्ये 10 टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे. याशिवाय परफॉरमन्स आधारीत बोनसही यंदा टाळण्यात आल्याची माहिती आहे.

रिलायन्सचे बडे अधिकारी, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक यांच्या पगारावरही कात्री लावण्यात आली आहे. या साऱ्या वरिष्ठांना 30 ते 50 टक्के कपात सहन करावी लागणार आहे. तसेच खुद्द रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी एकही रुपया न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हायड्रोकार्बन व्यवसायाला पेट्रोलियम पदार्थांची मागणी कमी झाल्याने मोठा फटका बसला आहे. कठीण परिस्थितीमुळे खर्चामध्ये कपात करणे अनिवार्य बनले आहे. यामुळे याकडे लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याचे कार्यकारी संचालक हितल मेस्वानी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-ऋषी कपूर यांच्या निधनानंतर केलेलं ट्विट अमिताभ बच्चन यांच्याकडून डिलीट!

-इरफान-ऋषींची एकापाठोपाठ एक एक्झिट; ‘या’ चित्रपटात केलंय एकत्र काम

-गेल्या 24 तासांत देशात 1823 नवे रुग्ण; कोरोनाग्रस्तांची संख्या 33610 वर

-पुण्यातील ‘या’ भागात तीन दिवसांसाठी पुन्हा अतिरिक्त निर्बंध; किराणा, भाजीपाला बंद

-“कोरोनावर औषध सापडलं”; पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा