बारामती भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल- शरद पवार

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून भाजपवर ईव्हीएमबाबत आक्षेप घेतले जात आहेत. आता त्यामध्ये राजकारणातील दिग्गज व्यक्तीमत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे आणखी भर पडली आहे.

बारामतीमध्ये भाजप जिंकल्यास लोकांचा विश्वास उडेल आणि लोकशाही आणि निवडणूक यंत्रणेवरचा विश्वास उडाला तर लोकं कोणत्याही टोकाला जातील, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.

‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

-त्याबाबत प्रश्न विचारला तेव्हा पवारांनी काय उत्तर दिलं?

देशभरात ईव्हीएमबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, कधीही निवडणूक न लढवणारे चंद्रकांत पाटील ईव्हीएमच्या जोरावर मोठ्या आत्मविश्वासाने बारामती जिंकण्याचा दावा करत आहेत. ईव्हीएमसोबत छेडछाड झाल्यास संसदीय लोकशाहीवर मोठा आघात होईलं, यातूनच लोकांचा संसदीय लोकशाहीवरील विश्वासही उडू शकतो.- शरद पवार

-शरद पवारांनी ईव्हीएम यंत्रणेबाबत शंका उपस्थित केली आहे. 

ईव्हीएममधील चीपला बाहेरुन सूचना देऊन मतांचे परिवर्तन करता येते, असं काही लोकांचं म्हणणं आहे. गुजरात, मध्यप्रदेशमध्ये असा प्रकार घडल्याचं वाचण्यात आलं आहे. आपल्याला लोकशाही पद्धतीचं जतन करायचं आहे. लोकांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहिला पाहिजे. दुर्दैवानं निवडणूक यंत्रणांवर राजकीय पक्ष खूप आक्षेप घेत आहेत. 

-बारामतीवरुन शरद पवारांना ईव्हीएमच्या यंत्रणेबाबत नेमकी काय शंका आहे? 

कोणत्याही चिन्हासमोरील बटण दाबून मतदान केलं तर ते मत कमळालच पडतं. हा मध्यप्रदेशमधील धक्कादायक वाचण्यात आला. बारामतीत भाजपच्या नेत्यांनी धाडस केलं सुप्रिया सुळे बारामती जिंकण्याची भिती आहे किंवा माढ्यातून शरद पवारांनी माढ्यातून लढू नये, अशा सर्व प्रश्नांवर भाजप धाडसाने बोलत आहे. 

-बारामती जागेबाबत शरद पवारांचं मत नक्की काय आहे? 

ज्यांनी कधी निवडणुका लढल्या नाहीत, तेदेखील बारामतीची जागा जिंकण्याचं धाडसाने सांगत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करुन काही नियोजन केलं आहे का? अशी शंका अनेकांच्या मनात आहे.- शरद पवार

पवारांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केला त्यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील काय म्हणाले? 

शरद पवारांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करणं म्हणजे त्यांना बारामतीच्या पराभवाची चाहूल लागली आहे.

शरद पवारांनी उपस्थित केलेल्या इव्हीएमबाबतच्या शंकेत काय तथ्य आहे का? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.